अर्थ मंत्रालय

ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सची पहिली आभासी बैठक आज भारतात संपन्न

Posted On: 06 APR 2021 9:35PM by PIB Mumbai

 

ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सची पहिली बैठक आज म्हणजेच 6 एप्रिल 2021 रोजी झाली, या बैठकीचे यजमानपद भारताकडे होते.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या आभासी बैठकीत ब्रिक्स देशांचे वित्तमंत्री आणि या देशांमधील मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स सहभागी झाले होते.

2021 ब्रिक्स परिषदेचे अध्यक्ष म्हणून, भारताचा दृष्टीकोन, सातत्यआंतर-ब्रिक्स देशांमध्ये  सहकार्य, सहकार्य आणि सहमती अधिक दृढ करण्यावर भर देण्याचा आहे.

ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सची, भारताच्या अध्यक्षतेखाली  2021 मध्ये झालेली ही पहिलीच बैठक होती. यावेळी, भारताने 2021 सालासाठी तयार केलेल्या वित्तीय सहकार्य अजेंड्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. जागतिक वित्तीय दृष्टीकोन आणि कोविड-19 ला प्रतिसाद, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपक्रम, सामाजिक पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सीमाशुल्काशी संबंधित मुद्यांवर सहकार्य, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील सुधरणा, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वित्त-तंत्रज्ञान आणि आर्थिक समावेशन, ब्रिक्स जलदगती माहिती सुरक्षा चैनेल आणि ब्रिक्स  फंड अशा विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

वर्ष 2021 साठी ब्रिक्सचे प्राधान्यक्रम आणि अजेंड्याविषयी माहिती देतांना, वित्तमंत्री सीतारामन यांनी माहिती दिली की ब्रिक्स देशातील नागरिकांच्या,विशेषतः उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील राष्ट्रांच्या गरजा आणि आकांक्षाचे प्रतिबिंब उमटेल,असे प्रयत्न आपण करायला हवेत, असे सीतारामन यांनी सांगितले.

यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी कोरोनाच्या संकटकाळात, ब्रिक्सच्या महत्वावर भर देतांना सांगितले की याचा सामना करण्यासाठी धोरणात्मक पाठींबा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवायला हवे. सीतारामन यांनी भारतात सुरु असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेकडे लक्ष वेधले. भारताने आतापर्यंत जगातील 84 देशांना 64.5 दशलक्ष लसींचा पुरवठा केला आहे. सामाजिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर याविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की यासठी आपण खाजगी क्षेत्रांची मदत घेऊन, नव्या, कल्पक वित्तीय मॉडेल्सचा वापर करायला हवा. पंतप्रधान आरोग्य विमा योजनेसाठी वापरल्या गेलेल्या आऊटपुट आधारित फंडिंग मॉडेलचा वापर केल्यामुळे आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक झाली, ज्यामुळे दुर्बल नागरिकांपर्यंत आरोग्य सेवांचा विस्तार करणे शक्य झाले, असे  सीतारामन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वित्तमंत्र्यांनी 2021 या वर्षासाठी,न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या संकल्पनांवर आधारित प्राधान्यांविषयी तसेच सदस्यसंख्या वाढवण्याविषयी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कोट्याविषयी 16 व्या सर्वसाधारण आढावा बैठकीबाबत, ब्रिक्स सदस्य देशांमध्ये आणखी समन्वय वाढवणे गरजेचे आहे, असे मत सीतारामन यांनी यावेळी मांडले. 

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1709961) Visitor Counter : 288