निती आयोग

सार्वजनिक प्रणालींमध्ये संशोधन करण्यासाठी ‘अटल इनोव्हेशन मिशन’ घेणार सीआयपीएस चे सहकार्य

Posted On: 06 APR 2021 8:19PM by PIB Mumbai

 

भारतात, नवोन्मेष आणि स्वयं उद्यमशीलतेची व्यवस्था पुन्हा एकदा विकसित करण्याच्या हेतूने, अटल इनोव्हेशन मिशन -AIM, नीती आयोग आणि सार्वजनिक प्रणालींमध्ये , नवोन्मेषविषयक केंद्र( सेंटर फॉर इनोव्हेशन्स इन पब्लिक सिस्टिम्स) – CIPS यांनी एकत्रित येऊन काम करणार असल्याची घोषणा आज केली.  देशात सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी, या संस्था सार्वजनिक व्यवस्थांमधील नवोन्मेष आणि संशोधनाचा डेटा तयार करणार आहेत.

या  संदर्भात AIM आणि CIPS यांच्यातील एका इरादापत्रावर (स्टेटमेंट ऑफ इंटेट) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अटल इनोव्हेशन मिशन कडे असलेले ज्ञान आणि सीआयपीस चा सार्वजनिक व्यवस्थांमध्ये असलेला वावर, याची सांगड घालून, देशात संशोधक वृत्ती आणि स्वयंउद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

AIM आणि CIPSमधील समन्वयातून स्टार्ट अप्सना स्थानिक प्रशासनासोबत काम करुन त्यांच्या संशोधनांचा तळागाळात उपयोग करण्यास मदत मिळेल.  स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाला, सार्वजनिक सेवा नागरिकांपर्यंत पोचवण्यात येत असलेल्या अडचणी आणि आव्हानांवर स्टार्ट अप कंपन्या कल्पक उपाय योजून तोडगा काढू शकतील. CIPS च्या मार्गदर्शनाखाली या कंपन्या यासाठी कृती आराखडा तयार करतील.

या इरादापत्रानुसार, AIM आणि CIPS, संयुक्तरीत्या बैठका आयोजित करतील आणि ज्यात, जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असेल. काही कल्पक, नवी उत्पादने आणि समस्येवरील समाधान याविषयी या बैठकांमध्ये चर्चा आणि जनजागृती केली जाईल. तसेच, खरेदीसंबंधीच्या प्रमाणित प्रक्रिया आणि धोरणे यांचीही माहिती त्यांना दिली जाईल आणि त्यांच्या कामांशी संबंधित नवनवी कल्पक उत्पादने तसेच इतर सुविधांची खरेदी व अंमलबजावणी ते करु शकतील.

आज तळागाळातील शिक्षकांची/मार्गदर्शकांची क्षमता बांधणी करणे ही काळाची गरज आहे, ज्यातूनच, विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेशी दृष्टीकोन आणि ज्ञान विकसित करता येईल. ही व्यवस्था संयुक्तपणे नवोनमेष ज्ञान व्यवस्थापन प्रणाली (iLMS) विकसित करुन निर्माण करता येईल.

या भागीदारीतून, AIM ने विकसित केलेल्या प्रोग्राम्सची जाहिरात आणि प्रोत्साहन राज्य आणि जिल्हा पातळीवर करणे तसेच, त्याविषयी राज्यांशी संपर्क साधणेही शक्य होईल.

यातील लाभार्थ्यांना, AIM  च्या उपक्रमांचे प्रशिक्षण घेण्यासाठी, CIPS च्या सुविधांचा वापर करता येईल आणि CIPS च्या संशोधन क्षमतांचा उपयोग, ग्रामीण संशोधन क्षेत्राचा आराखडा तयार करण्यासाठी केला जाऊ शकेल.

या आभासी इरादापत्राविषयी बोलतांना अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रामानन म्हणाले, सीआयपीएस सोबतच हा समन्वय अनेक दृष्टीने पथदर्शी ठरणार आहे, यामुळे तळागाळापर्यंत नावोन्मेष आणि स्वयंउद्यमशीलतेविषयी जनजागृती करण्यास मदत होईल. तसेच सार्वजनिक व्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

CIPS चे संचालक, सी अचलेंदर रेड्डी यांनी यावर आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले की AIM नीती आयोग आणि CIPS यांच्यातील समन्वय देशात, संशोधक व्यवस्था उभी करण्यात सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. याद्वारे अटल इंनोव्हेशन मिशनच्या विविश उपक्रमांनाही प्रोत्साहन देता येईल.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709936) Visitor Counter : 163