कायदा आणि न्याय मंत्रालय

सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने आपल्या ई कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुदापत्राच्या रुपरेषेवर हरकती, सूचना आणि प्रस्ताव मागवले

Posted On: 04 APR 2021 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2021

 

सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने  एका मोठ्या उपक्रमाचा आरंभ म्हणून आपल्या पुढाकाराने  ई -कोर्ट्स प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे व्हिजन डॉक्युमेंटचे मसुदापत्र भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीखाली तयार केले आहे. भारत सरकारच्या कायदा  विभागाने हाती घेतलेला, ई-कोर्ट प्रोजेक्ट हा महत्त्वपूर्ण  प्रकल्प आहे.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने काल उपरोक्त ई-न्यायालय प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यातील मसुद्याच्या दस्तऐवजाची झलक सादर केली. ई-कमिटीच्या प्रसिद्धीपत्रकात आज म्हटले आहे की मसुदा दस्तावेज ई-कमिटी वेबसाइटhttps://ecommitteesci.gov.in/document/draft-vision-document-for-e-courts-project-phase-iii/ यावर प्रकाशित केला आहे,आणि ई-समितीच्या अध्यक्षांनी सर्व भागधारकांना, म्हणजेच वकिल, प्रतिवादी, सामान्य नागरिक, विधी विद्यार्थी, तांत्रिक तज्ञ सर्वांना विनंती केली आहे,की ई-कोर्ट्स प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील मसूदा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या  योजनेसाठी,त्यांनी आपल्या मौल्यवान  सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी पुढे यावे,जेणेकरून भागधारकांचे ज्ञान, अंतर्दृष्टी, चिंता आणि अनुभव याची हा दस्तावेज परीपूर्ण करण्यास मदत होईल.

काल यासंदर्भात, ई-समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश डॉ. धनंजय वाय चंद्रचूड, यांनीही उच्च न्यायालयांचे सर्व मुख्य न्यायाधीश, कायदेशीर मान्यवर, कायदा महाविद्यालये, आयटी तज्ञ, यांना संबोधित करत विविध भागधारकांना, मसुदा दस्तऐवजांवर टिप्पण्णीवरच्या त्यांच्या सूचना आणि प्रस्तावांचे स्वागत  केले.

 या मसूद्यावरील आपले  अभिप्राय, सूचना, ई-कमिटी ईमेल आयडी ecommittee@aij.gov.in  वर 2 आठवड्यांच्या आत पाठवता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

 

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709499) Visitor Counter : 381