शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी एनसीटीई पोर्टलच्या “मायएनईपी 2020” मंचाची सुरुवात केली


1 एप्रिल ते 15 मे 2021 या कालावधीत हा मंच कार्यरत असेल

Posted On: 01 APR 2021 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज एनसीटीई वेब पोर्टलच्या मायएनईपी 2020 मंचाची सुरुवात केली. या मंचावर शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके (एनपीएसटी) आणि नॅशनल मिशन फॉर मेन्टरिंग प्रोग्राम मेम्बरशिप  (एनएमएम) विकसित करण्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी हितधारकांकडून सूचना / माहिती  / सदस्यत्व  आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. MyNEP2020 मंच 1 एप्रिल 2021 ते 15 मे 2021 पर्यंत कार्यरत असेल.

डिजिटल सल्लामसलतीच्या या अभ्यासामध्ये  शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रात शाश्वत आणि सकारात्मक बदलांसाठी शिक्षकांच्या धोरणावरील कागदपत्रे तयार करण्यात शिक्षक, शैक्षणिक व्यावसायिक, शिक्षणतज्ञ आणि इतर हितधारकांचा  सहभाग अपेक्षित आहे. एनईपी 2020 च्या वरील दोन प्रमुख शिफारसींबाबत  कागदपत्रे तयार करण्यासाठी, एनसीटीई  व्यक्ती / संघटनांबरोबर  सल्लामसलत  करेल.

तज्ज्ञ समिती सल्लामसलत कालावधीत संकलित माहितीचा सविस्तर आढावा घेईल आणि त्यानंतर  जनतेसाठी अंतिम मसुदा  तयार करेल. त्यानंतर  अधिसूचनेसाठी अंतिम मसुदा तयार करण्यासाठी हितधारकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709095) Visitor Counter : 216