रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
देशभरात विविध प्रकल्पांच्या नूतनीकरण, पुनर्निर्माण आणि पुनर्वसनास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मान्यता
Posted On:
01 APR 2021 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021
देशभरात विविध प्रकल्पांच्या नूतनीकरण, पुनर्निर्माण आणि पुनर्वसनास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील मंजुरी मिळालेले प्रकल्प खालीलप्रमाणे:-
महाराष्ट्र:-
- राष्ट्रीय महामार्ग 753 J वरील जळगाव-भद्रावन चाळीसगाव-नांदगाव-मनमाड मार्गाचे दुपदरी / चार पदरी बांधकाम आणि नूतनीकरण 252 कोटी रुपये आर्थिक तरतुदीसह मंजूर झाले आहे.
- राष्ट्रीय महामार्ग 166 E वरील गुहागर-चिपळूण रस्त्याचे नूतनीकरण 171 कोटी रुपये आर्थिक तरतुदीसह मंजूर झाले आहे.
- गडचिरोली जिल्ह्यात 262 कि.मी. ते 321 कि.मी. पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 353C चे नूतनीकरण करणे आणि गडचिरोली जिल्ह्यात 16 लघु व प्रमुख पूल बांधण्यास 282 कोटी रुपये आर्थिक तरतुदीसह मान्यता देण्यात आली आहे.
- राष्ट्रीय महामार्ग 752 I च्या वातूर ते चारठाणा विभागातील दोन मार्गिकांचे पुनर्वसन व नूतनीकरणासाठी 228 कोटी रुपये आर्थिक तरतुदीसह मान्यता देण्यात आली आहे.
- राष्ट्रीय महामार्ग 753 वरील तिरोरा-गोंदिया विभागाच्या दुपदरीकरणासाठी 282 कोटी रुपये आर्थिक तरतुदीसह मान्यता देण्यात आली आहे.
- राष्ट्रीय महामार्ग 166 G वरील तारेरे - गगनबावडा - कोल्हापूर विभागाच्या नूतनीकरणासाठी 167 कोटी रुपये आर्थिक तरतुदीसह मान्यता देण्यात आली आहे.
- राष्ट्रीय महामार्ग 753 वरील 28.2 कि.मी. लांबीच्या बांधकामसह तिरोरा-गोंदिया राज्य महामार्गाच्या विभागाच्या नूतनीकरणास 288.13 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
- नागपूर आरटीओ चौक ते नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे उड्डाणपूल आणि एनएच 53 वरील वाडी / एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपुलाचे काम मंजूर झाले असून त्यासाठी रु. 478.83 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
- एनएच 63 वर नांदेड जिल्ह्यातील येसेगी गावाजवळ मांजरा नदीवरील पुलाचे बांधकाम 188.69 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह मंजूर झाले आहे.
- एनएच 543 वरील आमगाव-गोंदिया विभागाच्या नूतनीकरणासाठी 239.24 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
- परळी ते गंगाखेड या एनएच 361F च्या विभागाच्या नूतनीकरण आणि पुनर्वसनासाठी 224.44 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709089)
Visitor Counter : 324