अर्थ मंत्रालय
5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जीएसटी करदात्यास 1 एप्रिल 2021 पासून सुधारित आवश्यकतेनुसार बिलावर एचएसएन कोड / सेवा लेखा कोड अनिवार्य
Posted On:
31 MAR 2021 6:43PM by PIB Mumbai
मागील आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जीएसटी करदात्यास 1 एप्रिल 2021 पासून 6 अंकी एचएसएन कोड (हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेन्क्लेचर कोड अर्थात नामांकन कोडची सुसंवाद प्रणाली) किंवा करपात्र वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी देण्यात आलेल्या बिलांवर एसएसी (सर्व्हिस अकाउंटिंग कोड) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या करदात्यास बी 2 बी अर्थात उद्योग ते उद्योग बिलांवर अनिवार्यपणे 4 अंकी एचएसएन कोड प्रदान करणे आवश्यक आहे. पूर्वी, आवश्यकता अनुक्रमे 4 अंक आणि 2 अंकांची होती. अधिक तपशीलांसाठी, अधिसूचना क्रमांक 78/2020-केंद्रीय कर, दि. 15.10.2020 रोजी संदर्भित केला जाऊ शकतो. (https://www.cbic.gov.in/resources//htdocs-cbec/gst/notfctn-79-central-tax-english-2020.pdf यावर उपलब्ध आहे.)
त्यानुसार 1 एप्रिल 2021 पासून, जीएसटी करदात्यांना सुधारित आवश्यकतेनुसार, त्यांच्या बिलात एचएसएन / एसएसी सादर करावे लागतील.
वस्तूंसाठी 6 अंकी एचएसएन कोड जगभर सारखे आहेत. म्हणून, हे समान एचएसएन कोड सीमाशुल्क आणि जीएसटीवर लागू होतात. त्यानुसार, सीमाशुल्क शुल्कामध्ये नमूद केलेले कोड जीएसटी उद्देशाने देखील वापरले जातात (जीएसटी दर वेळापत्रकात विशेष नमूद केले गेले आहेत). सीमाशुल्क शुल्कामध्ये एचएस कोड हेडिंग (4 अंकी एचएस), सब-हेडिंग (6 अंक एचएस) आणि शुल्क बाब (8 अंक) म्हणून दिले जाते. ही कागदपत्रे सीबीआयसी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एचएसएन कोडसाठी सीमा शुल्क दर https://www.cbic.gov.in/htdocs-cbec/customs/cst2021-020221/cst-idx यावर मिळू शकेल.
वस्तू आणि सेवांसाठी जीएसटी दरपत्रक पाहण्यासाठी https://www.cbic.gov.in/htdocs-cbec/gst/index-english यावर भेट देवू शकतो आणि नंतर जीएसटी दर / रेडी रेकनर-अद्यतनित सूचना / फाइंडर जीएसटी दर रेडी रेकनर / अद्यतनित सूचना यावर अनुसरण करा.
त्याचप्रमाणे एचएसएन शोध सुविधा जीएसटी पोर्टलवर देखील उपलब्ध आहे.
उत्पादक आणि आयातदार / निर्यातदार सामान्यत: एचएसएन कोड वापरत आहेत. जीएसटीपूर्व कारकीर्दीतही उत्पादक हे कोड देत होते. आयातदार आणि निर्यातदार हे कोड आयात/निर्यात विषयक कागदपत्रांमध्ये देत आहेत. व्यापारी मुख्यत: उत्पादक किंवा आयातदार पुरवठादारांकडून दिलेल्या बिलांमध्ये एचएसएन कोड वापरत असत. अशाच प्रकारे, मोठ्या संख्येने जीएसटी करदाते स्वेच्छेने बिलांवर, ई-वे बिल आणि जीएसटीआर 1 रिटर्नवर 6/8 अंकी एचएस कोड / एसएसी पूर्वीपासूनच सादर करीत आहेत.
****
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708761)
Visitor Counter : 308