विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान,पृथ्वीविज्ञान आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते डीएसआरआर-पीआरआयएसएम योजनेशी संलग्न जनजागृती मोहिमेचे उद्घाटन
आत्मनिर्भर भारतासाठीच्या उन्नत भारत अभियानाचे मर्म, ज्ञानाचे आदानप्रदान, सहभागित्वाचा दृष्टीकोन आणि अभिसरण या वैशिष्ट्यात आहे- संजय धोत्रे
Posted On:
30 MAR 2021 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 30 मार्च 2021
केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते डीएसआरआर-पीआरआयएसएम-( विज्ञान आणि उद्योग संशोधन –व्यक्ती, स्टार्ट अप्स आणि एमएसएमई क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन) शी संलग्न जनजागृती मोहिमेचे आयआयटी दिल्लीत आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे देखील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
“आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी, उन्नत भारत अभियानाचे मर्म, ज्ञानाचे आदानप्रदान, आणि अभिसरण ही वैशिष्ट्ये आहेत” असे, केंद्रीय शिक्षण, दूरसंवाद, इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री संजय धोत्रे यावेळी बोलतांना म्हणाले. या मोहिमेअंतर्गत, 14000 पेक्षा जास्त गावांमधील 2778 सह्भागी संस्थांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे, देशातील 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोहिमेची व्याप्ती पसरली आहे. आतापर्यंत सहभागी संस्थांपैकी 189 संस्थांनी तंत्रज्ञानविषयक सादरीकरण केले असून, इतर संस्थांचेही सादरीकरण लवकरच होणार आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि विकास करण्यासाठी उन्नत भारत अभियान, सीएसआयआर, ट्रायफेड, विभा आणि नेक्टर अशा संस्थांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उन्नत भारत अभियानाने ने रु-टॅग RuTAG, प्रधान मंत्री आदर्श ग्राम योजनेसोबत (PMAGY) ही सहकार्य केले असून, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी त्यातून प्रयत्न केले जात आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना, विज्ञान आणि तंत्रज्ञान,पृथ्वीविज्ञान आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन म्हणाले, “डीएसआयआर च्या PRISM योजनेमुळे वैयक्तिक संशोधकांना देशाच्या एकात्मिक विकासात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. PRISM द्वारे, देशातील कोणत्याही नागरिकाला, मूलभूत तंत्रज्ञान, जसे की स्वस्त दरात आरोग्यसुविधा, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, हरित तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त स्मार्ट मटेरियल, कचऱ्यापासून संपत्तीनिर्माण अशा आपल्या सर्व राष्ट्रीय उद्दिष्टांशी संलग्न अशा सेवा थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत.” असे हर्षवर्धन यांनी सांगितले.
पार्श्वभूमी:
व्यक्ती, स्टार्ट अप्स आणि एमएसएमई या क्षेत्रात नवोन्मेष-संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा (PRISM) हा उपक्रम, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाने सुरु केला असून, त्याचे उद्दिष्ट, वैयक्तिक संशोधकांना यशस्वीपणे प्रोत्साहन, पाठींबा देणे, आणि अंमलबजावणी करण्यायोग्य व्यवहार्य सामाजिक योजनांना निधी देणे हे आहे.
यासाठीचे अनुदान दोन टप्प्यात दिले जाते- संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आणि दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक कंपनी स्थापन करण्यासाठीची केंद्रे देशभरात उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यासाठीचे अनुदान 2 लाख ते 20 लाख रुपये आहे तर दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
आजच्या कार्यक्रमात 3500 संस्था आणि 50,000 संशोधक, तंत्रज्ञ ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708560)
Visitor Counter : 366