केंद्रीय लोकसेवा आयोग

संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर

Posted On: 30 MAR 2021 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2021


केंद्रीय लोक सेवा आयोगाने संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 साठी,22  ऑक्टोबर  2020 ला घेतलेल्या संगणक आधारित परीक्षा  (भाग – I)आणि त्यानंतर जानेवारी ते मार्च 2021 मध्ये घेतलेल्या व्यक्तिमत्व चाचणी (भाग- II) च्या निकालावर आधारित, सेवा/पदे नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची दोन संवर्गात सूची देण्यात आली  आहे.

संवर्ग – I

केंद्रीय आरोग्य सेवेत कनिष्ठ पदे  

संवर्ग II

(i) रेल्वेमध्ये   सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी;

(ii) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, भारतीय आयुध निर्माण कारखाना आरोग्य सेवा;

(iii) नवी दिल्ली नगरपरिषदेत साधारण सेवा वैद्यकीय अधिकारी आणि

(iv) पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली आणि दक्षिण दिल्ली  महानगरपालिकेत साधारण सेवा वैद्यकीय अधिकारी श्रेणी II

संवर्ग I साठी 179 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

संवर्ग II साठी एकूण 343 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी आयोगाने  संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020च्या नियम 13 (4) आणि (5) नुसार एकत्रित राखीव सूची ठेवली आहे.  या सेवा/पदे यासाठी रिक्त जागानुसार आणि उमेदवाराने विहित  पात्रता अटीची आणि नियुक्ती पूर्व सर्व औपचारिकता आणि पडताळणी यांची पूर्तता केल्यानंतर नियुक्ती केली जाईल.

केंद्रीय लोक सेवा आयोगाने आपल्या परिसरात परीक्षा वर्गाजवळ फॅसिलीटेशेन काउंटर अर्थात सुविधा कक्ष उभारला असून उमेदवार या परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वैयक्तिक रित्या अथवा 011-23385271 किंवा  011-23381125 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकतात.  

या परीक्षांचा निकाल केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या संकेतस्थळावर www.upsc.gov.in  वर उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसात गुण पत्रिका www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

संवर्ग- I च्या संपूर्ण सूचीसाठी इथे क्लिक करा –

संवर्ग- II च्या संपूर्ण सूचीसाठी इथे क्लिक करा –


* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708549) Visitor Counter : 235