संरक्षण मंत्रालय

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने आर्थिक वर्ष 2020-2021 साठी 32.85 कोटी रुपयांच्या अंतरिम लाभांशाचा धनादेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुपूर्द केला

Posted On: 30 MAR 2021 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2021

 

मिनी रत्न शिपयार्ड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई) या संरंक्षणविषयक सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने (डीपीएसयू) आपल्या समभागधारकांना आर्थिक वर्ष 2020-2021 साठी 44.10 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश दिला आहे. भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त रियर ऍडमिरल आणि कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही के सक्सेना यांनी सरकारचा वाटा म्हणून 32,85,63,774/- रुपयांच्या अंतरिम लाभांशाचा धनादेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नवी दिल्लीत 30 मार्च, 2021 रोजी सुपूर्द केला. संरक्षण उत्पादन सचिव राज कुमार यावेळी उपस्थित होते.

कोविड -19 महामारीच्या परिणामांची तमा न बाळगता जीआरएसईने आर्थिक वर्ष 2020-2021 साठी प्रति 10 रुपयांच्या समभागामागे 3.85 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. डीपीएसयू आपल्या भागधारकांना लाभांश देण्यास सातत्याने कार्यरत असून त्याने गेल्या 27 वर्षांपासून हे सातत्य टिकवले आहे.

1960 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, जीआरएसईला 100 हून अधिक युद्धनौका (आजवर 107 युद्धनौका) वितरित करणारे एकमेव संरक्षण शिपयार्ड असल्याचा मान आहे. 31डिसेंबर, 2020 पर्यंत या शिपयार्डला 25887/-  कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708497) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi