माहिती आणि प्रसारण मंत्रालय

डीडी फ्री डिशने ओलांडला 40 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा: ईवाय फिक्की मीडिया एन्टरटेन्मेंट अहवाल 2021

Posted On: 27 MAR 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2021

 

ईवाय फिक्की मीडिया एन्टरटेन्मेंट अहवाल 2021 नुसार डीडी फ्री डिशने आपला वाढीचा वेग कायम ठेवला आहे आणि त्याने अंदाजे 40 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढीचे श्रेय कमी खर्चीक टेलिव्हिजन संच, आर्थिक अडचणी, डीडी रेट्रो चॅनल सुरू करणे आणि विनामूल्य डिश प्लॅटफॉर्मवर मोठे प्रसारक परत येण्याला दिले जाते. काही वेळा दूरचित्रवाणीवर कोणतेही मोठे कार्यक्रम नसताना वापरला जाणारा डीडी फ्री डिश देखील घरातच दुसरा सेट टॉप बॉक्स बनला आहे. चीनमध्ये उत्पादित चिपसेटच्या कमतरतेमुळे मोफत डिश वितरकांनी वर्षाच्या विक्रीतील वाढ तसेच मागणीची पूर्तता करण्यास असमर्थता दर्शविली आहे. कनेक्टिव्ह टीव्हीद्वारे 2025 पर्यंत दूरचित्रवाणीचे ग्राहक 5% हून अधिक वाढ नोंदवत 40 दशलक्ष ग्राहकांचा तर डीडी फ्री डिश 50 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडू शकेल.

डीडी फ्री डिश, प्रसार भारतीची मल्टी-चॅनेल फ्री-टू-एअर डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा आहे. कोणत्याही वर्गणी शुल्काशिवाय लोकांना दर्जेदार करमणूक आणि माहितीसाठी पर्यायी आणि परवडणारे व्यासपीठ उपलब्ध करणे हे डीडी फ्री डिशचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.

सध्या डीडी फ्री डिशमध्ये 161 दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत ज्यात 91 दूरदर्शन वाहिन्यांसह (ज्यात 51 कोब्रँडेड  शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे), 70 खासगी वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्यांचा समावेश आहे. 1.4.2021 पासून डीडी फ्री डिश खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या समूहात 10 हिंदी जीईसी, 15 हिंदी चित्रपट, 6 संगीत, 20 बातम्या, 8 भोजपुरी, 3 भक्तीपर आणि 2 परदेशी वाहिन्यांचा समावेश असेल. डीडी फ्री डिश सध्या श्रेणीसुधारणा प्रक्रियेत आहे आणि मे 2021 पर्यंत त्याच्या समूहात आणखी काही वाहिन्या जोडल्या जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच एक ऑनलाइन वेब अॅप देखील जारी करण्यात आला आहे ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या जवळपासचे डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स विक्रेते शोधण्यात मदत होते.

भारतीय माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील फिक्की-ईवाय अहवालाच्या मार्च 2021 मध्ये  प्रसिद्ध झालेल्या अहवालात डिजिटल पायाभूत सुविधांबरोबरच डिजिटल माध्यमांच्या अवलंबामुळे माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील टीव्ही, रेडिओ, मुद्रित आणि डिजिटल इत्यादी माध्यम विभागातील सद्यस्थितीतले व भविष्यातील वाढीचे वातावरण दर्शविले गेले आहे.


* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1708082) Visitor Counter : 217


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi