रेल्वे मंत्रालय
रेल्वेसाठी सर्वात आव्हानात्मक वर्ष- पियुष गोयल
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2021 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2021
भविष्यात भारतीय रेल्वेचे यश देशाचे यश ठरवेल असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. क्षेत्रीय रेल्वेचे महा व्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. रेल्वेसाठी हे वर्ष सर्वात आव्हानात्मक वर्ष ठरले. लॉक डाऊनचे एक वर्ष. कोविड-19 विरोधात लढा देण्याचा रेल्वेचा निर्धार यात दिसून आला. रेल्वेच्या मानसिकतेत परिवर्तन झाले आहे. रेल्वेसाठी आता हा केवळ एक नेहमीचा व्यवसाय राहिला नसून नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि नवोन्मेश यामुळे नवे आयाम निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्वावलंबी,वक्तशीर, प्रवासी स्नेही, सुरक्षित, हरित आणि व्यापारासाठी प्राधान्यक्रमाची पसंती असलेली रेल्वे असे भविष्य घडवण्याची ही वेळ आहे.
1223 मेट्रिक टनाची मालाची सर्वोच्च वाहतूक म्हणजे राष्ट्रासाठी सकारात्मक संदेशच आहे. या वर्षी 5900 किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात आले. भारतीय रेल्वेने केलेले हे सर्वोच्च विद्युतीकरण असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्च 2021 मध्ये भारतीय रेल्वेने मालाची चढ-उतार,प्राप्ती आणि वेग यामध्ये मोठी गती साध्य केली आहे. गेल्या वर्षीच्या एकूण माल वाहतुकीपेक्षा यात वाढ अपेक्षित आहे. मालवाहतुकीतून 2020-21 या वर्षात 1,14,652.47 (कोटी ) रुपयांचा महसूल प्राप्त झाला.गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 2 % वाढ झाली आहे.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1707936)
आगंतुक पटल : 205