संसदीय कामकाज मंत्रालय
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब
संसदेच्या दोन्ही सभागृहात एकूण 18 विधेयके मंजूर
हे अधिवेशन लोकसभेत 114% तर राज्य सभेत 90% फलदायी ठरले
Posted On:
25 MAR 2021 10:18PM by PIB Mumbai
संसदेचे 2021 या वर्षीचे 29 जानेवारी 2021 रोजी सुरु झालेले संसदीय अधिवेशन आज 25 मार्च 2021 ला अनिश्चित काळासाठी तहकूब झाले.
या कालावधीत राज्यसभेचे कामकाज शुक्रवार 12 फेब्रुवारी 2021 रोजी आणि लोकसभेचे कामकाज शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी मध्यकालीन विश्रांतीसाठी स्थगित ठेवण्यात आले होते. त्यानंतर विविध विभागांशी संबंधित स्थायी समित्यांना विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या अनुदानविषयक मागण्यांचे परीक्षण करून अहवाल देणे शक्य व्हावे म्हणून या दोन्ही सभागृहांचे कामकाज 8 मार्च 2021 ला पुन्हा सुरु झाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल बोलताना, केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की या 2021 च्या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या 24 आणि राज्यसभेच्या 23 बैठका झाल्या. यापैकी अधिवेशनाच्या प्रथम सत्रात लोकसभेच्या 12 आणि राज्यसभेच्या 11 बैठका झाल्या तर द्वितीय सत्रात लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या प्रत्येकी 12 बैठका झाल्या.
मुळात हे अधिवेशन 8 एप्रिल 2021 पर्यंत सुरु राहणार होते. पण काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरु असलेल्या निवडणूक प्रक्रियेत संसद सदस्यांना भाग घेता यावा यासाठी दोन्ही सभागृहातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार हे अधिवेशन लवकर तहकूब झाले.
आभारप्रस्ताव:
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लॉकेट चटर्जी यांनी लोकसभेत आभार प्रस्ताव सादर केला आणि डॉ. वीरेंद्र कुमार यांनी त्याला अनुमोदन दिले.
परिशिष्ट
***
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707664)
Visitor Counter : 346