कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

मिशन कर्मयोगी

Posted On: 25 MAR 2021 4:16PM by PIB Mumbai

 

"राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता बांधणी कार्यक्रम" (NPCSCB) याला सरकारने 2 सप्टेंबर 2020 रोजी मंजूरी दिली.

नागरी सेवा क्षमता बांधणीसाठी खालील संस्थागत चौकट उपलब्ध करुन दिली आहे:

 (i) पंतप्रधान सार्वजनिक मनुष्यबळ परिषद (पीएमएचआरसी);

(ii) कॅबिनेट सचिवालय समन्वय विभाग;

(iii) क्षमता बांधणी आयोग;

(iv) विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही); आणि

(v) कार्यक्रम व्यवस्थापन आणि संबंधित सेवा पुरवण्यासाठी कार्यक्रम व्यवस्थापन एकक’ (पीएमयू).

मिशन कर्मयोगीसाठी तंत्रज्ञान डिजिटल शिक्षण व्यासपीठ प्रायोगिक पातळीवर पहिल्या टप्प्यात कार्यान्वित झाले आहे. यावर केंद्र व इतर प्रशिक्षण संस्थांकडून विविध प्रकारचे शिक्षण अभ्यासक्रम अपलोड केले जात आहेत. महत्त्वाचे राष्ट्रीय पथदर्शी (फ्लॅगशिप) कार्यक्रम आणि प्रकल्प राबवणारी मंत्रालये आणि विभागांना त्यांचे कार्यक्रम आणि प्रकल्पांच्या संदर्भात 'ई-आशय' विकसित करण्याची विनंती केली गेली आहे.

  (i) नागरी सेवा सुधारणांना आणि क्षमता बांधणीला धोरणात्मक दिशा देण्यासाठी;

  (ii) क्षमता बांधणीच्या वार्षिक योजना तयार करणे;

  (iii) प्रशिक्षण संस्थांवरील पर्यवेक्षण अधिक सक्षम करणे;

  (iv) सर्वोत्कृष्ट शिक्षण आशय प्रदान करणारे डिजिटल शिक्षण व्यासपीठ उपलब्ध करणे.

  (v) प्रभावी नागरिक केंद्रीत सेवा देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आणि क्षमता उचांवणे;

  (vi) कर्मचारी व्यवस्थापनासाठी डेटा-आधारित निर्णय सक्षम करणे

  (vii) प्रशासनात पारदर्शकता वृद्धी आणि जबाबदारी.

"राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता बांधणी कार्यक्रम "  या व्यतिरिक्त, सरकार सध्या खालीलप्रमाणे योजना राबवत आहे -

 (i) राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्व सरकारी अधिका-यांच्या क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने सर्व योजनांसाठी प्रशिक्षण.

 (ii) परदेशातल्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजनेद्वारे (डीएफएफटी), सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संस्थांमधील अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रशिक्षण, अभ्यासक्रमांची उपलब्धता.

 (iii) केंद्रीय प्रशिक्षण संस्थांमार्फत नागरी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना मूलभूत आणि सेवेच्या मध्यावर प्रशिक्षण आणि निधीचे सहाय्य करणे.  

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पूर्वोत्तर प्रदेशाचा विकास ((DoNER)), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश, डॉ जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत प्रश्नांच्या लेखी उत्तरात आज ही माहिती दिली.

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1707533) Visitor Counter : 295


Read this release in: English , Urdu , Bengali , Punjabi