रेल्वे मंत्रालय
IRCTC च्या संकेतस्थळाद्वारे मिळालेला महसूल
Posted On:
24 MAR 2021 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2021
भारतीय रेल्वेद्वारे संचालित गाड्यांच्या तिकिटांच्या आरक्षणासाठी आयआरसीटीसीच्या ई-तिकीट संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षण सुविधा देण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रवाशांनी केलेल्या तिकीट खरेदीतून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जमा झालेले उत्पन्न खालील तक्त्यात दर्शविले आहे:-
Year
|
Amount collected as ticket fare
( in Crores)
|
2018-19
|
32,070
|
2019-20
|
34,055
|
2020-21
Till Feb, 2021
|
14,915
|
ग्राहक संवादाच्या महत्त्वाच्या सेवेसाठी रेल्वे विभाग माहिती तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधांचा वापर करतो. गाड्यांमधील अनारक्षित तिकिटांच्या खरेदीसाठी युटीएस अर्थात अनारक्षित तिकीट खरेदी प्रणालीची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वे गाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांकडून त्याचे शुल्क आणि वाघीण नोंदणी शुल्क घेण्यासाठी आयआरसीटीसीने ई-पेमेंट सुविधा सुरु केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून 2019-20 मध्ये 76.16% मालवाहतूक शुल्काची वसुली झाली होती. त्यात 2020-21 मध्ये वाढ होऊन रेल्वेला 83.77% शुल्क प्राप्ती झाली आहे.
केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तराद्वारे आज ही माहिती दिली.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707302)
Visitor Counter : 136