वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कमी मूल्य आकारून वेगळी उत्पादने देण्यावर भारत लक्ष केंद्रित करीत आहे - पियुष गोयल
आत्मनिर्भर, स्वावलंबी आणि आत्मविश्वास असलेला भारत जगाशी जोडला जाईल
Posted On:
23 MAR 2021 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2021
केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक कल्याण आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आज म्हणाले की, आपण एक आत्मनिर्भर, स्वावलंबी आणि आत्मविश्वास असलेला असा भारत बघत आहोत, जो येणाऱ्या काळात जगाशी जोडला जाईल. इंडिया सर्विसेस कॉनक्लेव्ह 2021 च्या आभासी माध्यमातून उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना, ते म्हणाले की, कमी मूल्य आकारून वेगळी उत्पादने देण्यावर देश लक्ष केंद्रित करीत आहे, ज्यामुळे अद्वितीयपणे वस्तू उत्पादन आणि सेवा तयार करण्यात मदत करेल. कोविडमुळे नव्याने जगासमोर आलेल्या नव्या डिजिटल जगात सेवाकार्याविषयी आपल्या गुंतवणुकीत त्यांनी भारताबरोबर चालण्याचे, भारताबरोबर संवाद साधण्याचे आणि भारताच्या बरोबरीने वेगाने आपलाही वेग वाढविण्यासाठी त्यांनी जगाला आमंत्रित केले आहे.
मंत्री म्हणाले की, सर्वाधिक कडक टाळेबंदी असतानासुद्धा, या काळात जगभराशी भारताची असलेली वचनबद्धता भारताने काटेकोरपणे पूर्ण केली आहे.
मंत्री म्हणाले, की सेवा हा आपला स्पर्धात्मक फायदा आहे. सेवाक्षेत्र ही भारतातील एक लक्षणीय यशोगाथा आहे. या क्षेत्राने सातत्याने वृद्धिंगत होत असलेला आणि जागतिक आव्हानांचा एक स्वावलंबी चेहरा दाखविला आहे.
ते म्हणाले की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि उत्पादन क्षमता अद्ययावत करून आणि कौशल्य पातळी कशी उंचावता येईल, याची खात्री करून घेण्यासाठी देशाला तयार करीत आहोत.
M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706983)
Visitor Counter : 147