पर्यटन मंत्रालय
"भारत आणि कोरोना विषाणू महामारी: पर्यटन संबंधितांचे आर्थिक नुकसान आणि परिस्थिती सावरण्याचे धोरण" याबाबत पर्यटन मंत्रालयाने केलेला अभ्यास
प्रविष्टि तिथि:
23 MAR 2021 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2021
पर्यटन मंत्रालय आणि राष्ट्रीय उपयोजित वित्तीय संशोधन परिषद, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) ने जानेवारी 2021 मधे एकत्र येत कोरोना महामारीचा पर्यटनावर झालेला परिणाम यावर अभ्यास सुरु केला आहे. "भारत आणि कोरोना विषाणू महामारी: पर्यटन संबंधितांचे आर्थिक नुकसान आणि परिस्थिती सावरण्याचे धोरण" हा अभ्यासाचा विषय आहे.
या अभ्यासाचे उद्दीष्ट पुढीलप्रमाणे आहे.
पर्यटन उद्योगावर महामारीमुळे झालेल्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामांचा एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला हे प्रमाणित करणे. यात विशेषत: पर्यटन संबंधित कुटुंबांच्या उत्पन्नाची औपचारिक आणि अनौपचारिक अशी वर्गवारी करता येईल.
पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री श्री प्रल्हादसिंग पटेलिन यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706965)
आगंतुक पटल : 166