सांस्कृतिक मंत्रालय

वर्ष 2019 साठी गांधी शांतता पुरस्कार जाहीर

Posted On: 22 MAR 2021 6:00PM by PIB Mumbai

 

ओमानचे दिवंगत राजे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांना वर्ष 2019 साठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. गांधी शांतता पुरस्कार, 1995 पासून भारत सरकारतर्फे दरवर्षी दिला जातो. महात्मा गांधीजींचे यंदा 125 वे जयंती वर्ष आहे. राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जाती, धर्म किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्तींसाठी हा पुरस्कार खुला आहे.

गांधी शांतता पुरस्कारा साठीच्या निवड समितीचे अध्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्याचबरोबर दोन माजी वरिष्ठ पदाधिकारी, यात सरन्यायाधीश आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि सुलभ आंतरराष्ट्रीय समाजसेवा संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक हे दोन प्रमुख मान्यवर सदस्य या मंडळाचे सदस्य आहेत.

निवड समिती सदस्यांची 19 मार्च 2021 रोजी बैठक झाली आणि विचारविनिमयानंतर एकमताने ओमानचे माजी राजे दिवंगत सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गांधींजींनी दाखवलेल्या अहिंसा आणि इतर मार्ग, पद्धतींच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांना सन 2019 साठी गांधी शांती पुरस्कार जाहीर झाला आहे.

रुपये एक कोटी, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला भेट हे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राजे सुलतान काबूस एक दूरदर्शी नेते होते. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांबाबत समतोल आणि मध्यस्थीची भूमिका घेणे यामुळे जगभरात त्यांची प्रशंसा झाली. त्यांनी मोठा आदर प्राप्त केला. विविध प्रादेशिक वाद आणि विवादांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सुलतान काबूस हे भारत आणि ओमान यांच्यातील विशेष संबंधांचे शिल्पकार होत. त्यांनी भारतात शिक्षण घेतले आणि नेहमीच भारताशी खास नातेसंबंध कायम ठेवले. त्यांच्या नेतृत्वात भारत आणि ओमान सामरिक भागीदार बनले आणि उभय देशांची परस्पर भागीदारी फायदेशीर, सर्वसमावेशक तसेच बळकट झाली आणि या भागीदारीला नवीन उंचीवर नेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजे सुलतान काबूस यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुलतान काबूस यांचे निधन झाले त्याआधी त्यांनी भारत-ओमानमधील संबंध दृढ केले होते. तेव्हा ते म्हणाले होते की ते भारताचे खरे मित्र आहेत आणि त्यांनी भारत आणि ओमान यांच्यात धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठी मजबूत नेतृत्व केले आहे. पंतप्रधानांनी त्यांचा दूरदर्शी नेते आणि राजकारणी तसेच आपल्या प्रदेश आणि जगासाठी शांतीचा प्रकाश अशा शब्दात गौरव केला.

 

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1706681) Visitor Counter : 473