रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सायबर घुसखोरीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान सुरक्षा अधिक कडक करण्याच्या सूचना
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2021 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2021
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला संभाव्य दुर्भावनायुक्त हेतूने भारतीय परिवहन क्षेत्राच्या दिशेने निर्देशित लक्ष्यित घुसखोरीच्या क्रियांच्या संदर्भात सीईआरटी-इन अर्थात भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद कार्यसंघाकडून सतर्कतेचा इशारा मिळाला. मंत्रालयाने परिवहन क्षेत्रांतर्गत असलेल्या विभागांना आणि संस्थांना त्यांच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा परिस्थिती मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे.
त्यानुसार एनआयसी, एनएचएआय, एनएचआयडीसीएल, आयआरसी, आयएएचई, राज्य पीडब्ल्यूडी, चाचणी संस्था आणि ऑटोमोबाईल उत्पादकांना सीईआरटी-इन प्रमाणित संस्थेद्वारे संपूर्ण माहिती तंत्रज्ञान प्रणालीचे सुरक्षा ऑडिट (लेखा परीक्षण) नियमितपणे करावे आणि त्यांच्या शिफारशीनुसार सर्व कार्यवाही करण्याची विनंती केली गेली आहे. लेखा परिक्षण अहवाल व एटीआर नियमितपणे मंत्रालयाला सादर करावा लागतो.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706486)
आगंतुक पटल : 236