श्रम आणि रोजगार मंत्रालय

चालू आर्थिक वर्षात जानेवारी पर्यंत 62.49 लाख वापरकर्ते जोडले गेले: वेतनपट माहिती

Posted On: 20 MAR 2021 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2021

 

इपीएफओ ने 20 मार्च 2021 रोजी जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून केवळ जानेवारी महिन्यात त्यात  13.36 लाखांची वाढ झाली आहे. कोविड महामारीच्या काळातही इपीएफओ च्या एकूण वापरकर्त्यांची संख्या चालू आर्थिक वर्षात सुमारे 62.49  पर्यंत पोहोचली आहे.

या आकडेवारीनुसार,डिसेंबर 2020 च्या तुलनेतजानेवारी 2021 मध्ये आकडेवारीत 24%ची वाढ झाली आहे. तर वार्षिक तुलनेत ही वाढ 27.79% इतकी आहे.यातून कोविडपूर्व काळातली ग्राहकांची संख्या आता पूर्ववत होऊ लागली असल्याचेच स्पष्ट होत आहे. इपीएफओ अने अलीकडे घेत्लेलेया ई-उपक्रमांनाही याचे श्रेय जाते. या माध्यमातूनम विना-अडथळा सेवा देण्यासोबतच, कोविड काळात ABRY, PMGKY आणि PMRPY च्या मदतीने अर्थव्यवस्था सुरळीत करण्याला प्राधान्य दिले गेले.

जानेवारी महिन्यात जे 13.36 लाख वापरकर्ते जोडले गेले, त्यापैकी सुमारे 8.20 लाख नव्या सदस्यांना ईपीएफओ च्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल. सुमारे 5.16 लाख वापरकर्त्यांनी आपली नोकरी बदलल्यानंतरही ईपीएफओ चे सदस्यत्व घेतले. या सर्व सदस्यांना आता काहीही त्रास न होता, त्यांचा भविष्य निर्वाह निधी एका कंपनीकडून दुसरीकडे वळवता येणार आहे.  वेतनपट आकडेवारीनुसार, ईपीएफओ च्या सदस्यांची संख्या जून 2020 पर्यंत वाढत होती, मात्र, त्यानंतर ती चालू आर्थिक वर्षात कमी झाली होती, या सदस्यत्वावर कोविडचा विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे.

वयनिहाय आकडेवारीनुसार बघितले असता, 22-25 वर्षे वयोगटातील वापरकर्त्यांच्या संख्येत 3.48 लाखांची भर पडली आहे. हा  वयोगट ताज्या दमाच्या नोकरदारांचा आहे. त्यानंतर 29-35 या वयोगटातील सुमारे 2.69 लाख वापरकर्ते आहेत. हे अनुभवी कर्मचारी असून, त्यांनी कारकीर्दीतील प्रगतीसाठी आपल्या नोकऱ्या बदलल्या आहेत.

या आकडेवारीतील विविध व्यवसायातील श्रेणीनुसार मुल्यांकन देखील बघितले असता, तज्ञ सेवा’ श्रेणीतील नोकरदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे 5.65 लाख इतकी आहे.

देशभरातील राज्यांची तुलनातत्मक आकडेवारी बघितल्यास, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून चालू आर्थिक वर्षात  सर्व वयोगटातील एकूण 62.49 लाख कर्मचाऱ्यांपैकी त्यांनी या आकडेवारीत 34.24 लाख सदस्यांची भर घातली आहे .

लैंगिक आधारावरील आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात 2.61 महिला सदस्यांची भर पडली. ही वाढ डिसेंबर 2020 च्या तुलनेत, 30% इतकी आहे.

ही वेतनपट आकडेवारी प्राथमिक असून त्यात सातत्याने बदल होत असतात. दर महिन्यात, ही आकडेवारी अद्ययावत होत असते.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1706351) Visitor Counter : 154