रसायन आणि खते मंत्रालय

राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणाने 80 पेक्षा अधिक औषधांना मूल्य नियमाअंतर्गत केले समाविष्ट

Posted On: 20 MAR 2021 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2021

 

राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणाने (NPPA) अशा 81 औषधांचे मूल्य निश्चित केले आहे, ज्यात ऑफ पेटंट मधुमेहावरील औषधांचा समावेश आहे जेणेकरून पेटंटची मुदत संपण्यापूर्वी रूग्णांना त्याचा लाभ होईल.

एनपीपीएने दिनांक 13.03.2021 पासून मेसर्स वोखहार्ट लिमिटेडच्या इन्सुलिन इंजेक्शन 200 आययू/ एम एल, आणि 70% आयसोफेन इन्सुलिन ह्यूमन सस्पेंशन +30% इन्सुलिन  ह्यूमन इंजेक्शन  200 आययू/ एम एल यांची किरकोळ  किंमत 106 रुपये 65 पैसे पर मिली (जीएसटी वगळून) तसेच मेसर्स टोरेन्ट फार्मास्युटीकल्स लिमिटेडच्या प्रासुग्रेल हायड्रोक्लोराईडच्या 10 मिलीग्रॅम( कोटेड फिल्म) + 75 मिलीग्रॅम ऍस्प्रीन (एन्टेरीक कोटेड) कॅप्सूलची किंमत 27 रुपये 16 पैसे प्रति कॅप्सूल जीएसटी वगळून) इतकी निश्चित केली आहे. यापूर्वी दोन्ही औषधांची छापील किंमत अनुक्रमे 132 रुपये 50 पैसे प्रती मिली आणि 27 रुपये 26 पैसे प्रति कॅप्सूल इतकी होती. या मूल्य नियमनामुळे एनपीपीएने मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना वाजवी दरात औषधे उपलब्ध होतील, हे सुनिश्चित केले आहे.

स्वदेशी संशोधन आणि विकास यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या नव्या औषध वितरण प्रणालीमुळे एनपीपीएने वरील औषधांसाठी या कंपन्यांना पाच वर्षांसाठी औषध मूल्य नियंत्रण अधिसूचना 2013 च्या 32 व्या परिच्छेदानुसार किंमतीत सूट दिली होती. सूट दिलेल्या कालावधीत किंमतीवरील नियंत्रण लागू केले नव्हते. सूट दिलेला कालावधी पूर्ण झाल्यामुळे  एनपीपीएच्या दिनांक 10.03.2021  रोजी झालेल्या बैठकीत डीपीसीओ 2013 मधील तरतुदींनुसार या औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे  इन्सुलिन इंजेक्शन 200 आययू/ एम एल आणि 70% आयसोफेन इन्सुलिन  ह्यूमन सस्पेंशन +30% इन्सुलिन  ह्यूमन इंजेक्शन +30% इन्सुलिन ह्यूमन इंजेक्शन 200 आययू/ एम एल यांच्या सध्याच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. आता ही औषधे जनतेला वाजवी दरात उपलब्ध होत आहेत.

एनपीपीएने दिनांक 10.03.2021  रोजी झालेल्या बैठकीत 76 नव्या औषधांच्या किरकोळ किंमती निश्चित केल्या ज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पादकांच्या ऑफ पेटंट मधुमेह विरोधक औषधांचा समावेश आहे.

याशिवाय एनपीपीएने 2 अधिसूचित औषधांच्या किंमतीच्या कमाल मर्यादेवर बंधन आणले आहे ती म्हणजे पोव्हिडोन आयोडीन 7.5% स्क्रब जे संसर्गरोधक औषध आहे आणि 37.5  मिलिग्रॅमची  लिव्हो थायरॉक्झिनची गोळी जे थायरॉईड ग्रंथीच्या रोगावरील उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे, ज्यामुळे त्यांच्या सध्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे.

प्राधीकरणाने घाऊक किंमत निर्देशांकानुसार (WPI) अधिसूचित औषधांच्या विद्यमान कमाल मर्यादा किंमतीतही सुधारणा करण्यासही मान्यता दिली. या सुधारीत किंमती एप्रिल 2021 पासून लागू होतील.

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1706288) Visitor Counter : 207


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi