सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

पंतप्रधानांच्या बांगलादेश दौऱ्यात खादीचे मुजीब जॅकेट ठरणार आकर्षण

Posted On: 20 MAR 2021 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्याला मुजीब खादी जॅकेटमुळे विशेष झळाळी प्राप्त होणार आहे. भारताचे खास वारसा लाभलेले खादी हे कापड सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 मार्च रोजी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) खास तयार केलेले शंभर मुजीब जॅकेट या दौऱ्यासाठी उपलब्ध केले आहेत. पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान मुजीब जॅकेट्स हा मान्यवरांचा पोशाख असेल.

मुजीब जॅकेट हे बांग्लादेशचे राष्ट्रपिता वंगबंधु शेख मुजीबुर रहमान परिधान करत. हे जॅकेट त्यांची विशेष ओळख म्हणून प्रसिद्ध आहे, शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी, मुजीब बोर्शो बांग्लादेश साजरा करत आहे. त्या आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ढाका येथील भारतीय उच्चायोगाच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राने या शंभर खादी मुजीब जॅकेटची मागणी नोंदवली होती.

केव्हीआयसीचे अध्यक्ष श्री विनय कुमार सक्सेना म्हणाले की, मुजीब जॅकेट बांगलादेशात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि विशेष म्हणजे खादीचे सर्वात मोठे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यात खादीपासून निर्मित हे मुजीब जॅकेट दौऱ्याची शोभा वाढवणार आहेत ही अभिमानाची बाब आहे.

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1706285) Visitor Counter : 211