आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड लसीकरण लाभार्थी

Posted On: 19 MAR 2021 7:40PM by PIB Mumbai

 

कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या व्यवस्थापनाबाबत कार्यरत राष्ट्रीय तज्ञ गटाने (एनईजीव्हीएसी) केलेल्या शिफारशीनुसार पुढिल गटातील व्यक्ती लसीकरणीसाठी पात्र आहेत.

आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत कर्मचारी, कोरोना प्रतिबंधासाठी आघाडीवर काम करणारे कर्मचारी, 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार (सह्व्याधी)असलेले व्यक्ती.

co-win 2.0 पोर्टल / वेबसाइट किंवा आरोग्यसेतू अ‍ॅपद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येते.

कोविन 2.0  वरील मार्गदर्शक सूचनांनुसार, खालीलपैकी कोणत्याही छायाचित्र ओळखपत्र असलेल्या दस्तऐवजाचा उपयोग ऑनलाइन नोंदणीसाठी नागरीक करु शकतात: आधार कार्ड, मतदार  ओळखपत्र (ईपीआयसी), पारपत्र (पासपोर्ट), वाहन परवाना, पॅन कार्ड, एनपीआर स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज.

को-विन 2.0 मध्ये लाभार्थ्यी ऑनलाईन नोंदणीच्या वेळी सोयीचे कोविड लसीकरण केंद्र निवडू शकतात अशी तरतूद आहे.

15 मार्च 2021 पर्यंत 3.05 कोटी लाभार्थी (आरोग्य कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी, 60 वर्षे वयाच्या किंवा अधिक वयाच्या व्यक्ती आणि विशिष्ट आजार असलेल्या 45- 59 वर्षे वयाच्या व्यक्ती) यांची को-विन 2.0 पोर्टलवर नोंदणी झाली आहे.

लसीकरणासाठी पात्र 45 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी निर्धारित 20 आजारांची यादी खालील प्रमाणे

एस.एन.                                                     निकष

1          गेल्या एका वर्षात हृदय विकारामुळे रुग्णालयात दाखल.

2          हृदय विकाराच्या धक्क्यानंतर अवयव रोपण / लेफ्ट व्हेन्ट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस (एलव्हीएडी)

3          सिग्निफिकंट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर सिस्टोलिक डिसफंक्शन (एलव्हीईएफ <40%)

4          मध्यम किंवा गंभीर व्हॉलव्ह्युलर हृदय रोग

5          गंभीर पीएएच किंवा इडिओपॅथिक पीएएच सह जन्मजात हृदय रोग

6          गतकाळात सीएबीजी / पीटीसीए / एमआय सह हृदय धमनी रोग आणि उच्च रक्तदाब / मधुमेह यावर उपचार सुरु आहेत.

7          उपचारासाठी एनजाइना (छातीत अस्वस्थता) आणि उच्च रक्तदाब / मधुमेह यावर उपचार सुरु आहेत.

8          सीटी / एमआरआय यामधे स्पष्ट दाखवलेले स्ट्रोक किंवा झटका आणि उच्च रक्तदाब / मधुमेह

9          फुफ्फुसीय धमनी उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाब / मधुमेहावर उपचार सुरु आहेत.

10        मधुमेह (> 10 वर्षे) आणि उच्च रक्तदाबावर उपचार सुरु.

11         मूत्रपिंड / यकृत / हेमेटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण: प्राप्तकर्ता / प्रतीक्षा यादीत आहेत.

12        मूत्रपिंड रोगाच्या शेवटच्या टप्प्यात हेमोडायलिसिसवर असलेले / सीएपीडी

13        कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि / इम्युनोसप्रप्रेसंट औषधांचा दीर्घकाळ वापर

14        डिकॉम्पनसेटेड सिरॉयसिस

15        मागील दोन वर्षात श्वसन रोगामुळे रुग्णालयात दाखल/ एफईव्ही 1 <50%

16        लिम्फोमा / ल्यूकेमिया हे रक्ताचे कर्करोग आणि मायलोमा हा अस्थिंसंदर्भातला आजार

17        1 जुलै  2020 रोजी किंवा नंतर कोणत्याही कर्करोगाचे निदान किंवा सध्या कोणत्याही कर्करोगावर उपचार सुरु

18        सिकल सेल रोग / अस्थिमज्जा रोग / अप्लास्टिक अॅनेमिया / थॅलेसीमिया मेजर

१.         प्राथमिक इम्युनोडेफिशियन्सी रोग / एचआयव्ही संसर्ग

 

20        विकलांगता असलेले व्यक्ती त्यात बौद्धिक अपंगत्व / स्नायू दोष / अॅसिड हल्ल्यामुळे श्वसन विकार / बहिरेपण-अंधत्व यासह सहाय्य लागू शकणारे विविध अपंगत्व

राज्यमंत्री (आरोग्य व कुटुंब कल्याण), श्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

*****

Jaydevi PS/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1706134) Visitor Counter : 204