युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

सवयींमधे परिवर्तन आणि शारिरीकदृष्ट्या अधिक सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करणे हा फिट इंडिया अर्थात तंदुरुस्त भारत चळवळीचा उद्देश : श्री किरेन रिजिजू

Posted On: 18 MAR 2021 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मार्च 2021

 

फिटनेस अर्थात निरामय तंदुरुस्ती हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा या उद्देशाने पंतप्रधानांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी फिट इंडिया चळवळ सुरू केली. सवयींमधे परिवर्तन आणि शारिरीकदृष्ट्या अधिक सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करणे हा फिट इंडिया अर्थात तंदुरुस्त भारत चळवळीचा उद्देश आहे.

हे ध्येय साध्य करण्यासाठी,केंद्रीय क्रीडा  मंत्रालय खालील विविध उपक्रम राबवत आहे. आणि कार्यक्रम आयोजित करत आहे:

  1. फिटनेस अर्थात तंदुरुस्ती व्यक्तीला सहज, आनंदी आणि मुक्त करते याचा प्रसार करणे;
  2. कालबद्ध आणि समर्पित मोहिमांद्वारे  फिटनेसला प्रोत्साहन  देणार्‍या विविध शारीरिक खेळ आणि व्यायामांबद्दल  जागरूकता पसरवणे;
  3. स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देणे.
  4. प्रत्येक शाळा, महाविद्यालय / विद्यापीठ, पंचायत / गाव इत्यादीपर्यंत फिटनेस चळवळ पोहोचवणे; आणि
  5. भारतीय नागरिकांनामधे तंदुरुस्तीविषयीच्या माहितीचे आदानप्रदान  करणे, जागरूकता वाढवणे आणि यासंदर्भातल्या वैयक्तिक यशोगाथा सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रोत्साहन देत  एक व्यासपीठ तयार करणे.

हे मंत्रालय विविध समविचारी घटकांच्या सहकार्याने विविध उपक्रम आणि मोहिमांच्या माध्यमातून फिटनेसविषयी  जागृती करत आहे. फिट इंडीयाच्या झेंड्याखाली या मंत्रालयाद्वारे राबवले जात असलेले प्रमुख उपक्रम खालील प्रमाणे ( यात ऑफलाईन आणि ऑनलाईन उपक्रमांचाही समावेश आहे).

शालेय प्रमाणपत्र पद्धती, युथ क्लब प्रमाणपत्र पद्धती, शालेय सप्ताह साजरा करणे, सायक्लोथॉन, योग दिवस साजरा करणे, स्वातंत्र्य दौड, टाळेबंदीच्या काळात सक्रीय राहण्याचे उपक्रम, विविध पुरस्कार विजेता यांबरोबरच संवाद, परिसंवाद, स्वदेशी खेळांच्या मालिका, फिट इंडिया विषयीचे उपक्रम आणि प्रभात फेरी.

यानंतर प्रत्येक वयोगटाला साजेसे नियम आणि मापदंडही लागू करण्यात आले. फिट इंडिया चळवळ ही लोकांची चळवळ आहे ज्यात प्रत्येक नागरिक भागधारक आहे.  फिट इंडिया पोर्टलवर एक प्रणाली देखील विकसित केली आहे, लोक तिथे स्वेच्छेने पुढे येऊ शकतात आणि या चळवळीचा एक भाग बनू शकतात. मात्र, फिट इंडिया चळवळीचा संदेश देशातील प्रत्येक भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही प्रसिद्ध मान्यवर / फिटनेस क्षेत्रातले मान्यवर / फिटनेस प्रमोटर्स यांना फिट इंडिया आयकॉन म्हणून निवडले आहे.  यात अनिल कपूर, शिल्पा शेट्टी,  शाहिद कपूर,  विद्युत जामवाल, रणविजय सिंह, चेतन भगत, मिलिंद सोमण आदी मान्यवरांचा सहभाग आहे.  केंद्र व राज्य सरकारच्या विविध संस्थांच्या  पाठिंब्याबरोबरच Transtadia, FICCI, CII, SPEFL, GOQii इत्यादी अनेक खाजगी संस्थादेखील फिट इंडिया चळवळीस पाठिंबा देत आहेत.

ही माहिती युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्री किरेन रिजिजु यांनी आज लोकसभेत दिली.


* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1705807) अभ्यागत कक्ष : 163
Read this releasein: English , Urdu , Manipuri , Punjabi