खाण मंत्रालय
जानेवारी 2021 मधील खनिज उत्पादनाची स्थिती (अंतरिम)
प्रविष्टि तिथि:
18 MAR 2021 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2021
खाण व उत्खनन क्षेत्रातील जानेवारी 2021 महिन्यातील खनिज उत्पादन निर्देशांक (2011-12=100 वर आधारित) 119.7 आहे. हा निर्देशांक जानेवारी 2021 मधील निर्देशांकाच्या तुलनेत 3.7% ने कमी आहे. एप्रिल-जानेवारी 2020-21 या कालावधीमध्ये झालेली एकूण वाढ, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत (-) 10.4 टक्के आहे.
जानेवारी 2021 मध्ये मुख्य खनिजांची उत्पादन पातळी याप्रमाणे होती: कोळसा 737 लाख टन, लिग्नाइट 37 लाख टन, नैसर्गिक वायू (वापर झालेला) 2478 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (क्रूड) 26 लाख टन, बॉक्साइट 1882 हजार टन, क्रोमाइट 471 हजार टन, संहत तांबे 10 हजार टन, सोने 92 किलो, पोलाद 214 लाख टन, शिसे 35 हजार टन, मॅंगनीज खनिज 270 हजार टन, संहत जस्त 150 हजार टन, चुनखडी 344 लाख टन, फॉस्फोरेट 141 हजार टन, मॅग्नेसाइट 7 हजार टन आणि डायमंड 0 कॅरेट.
जानेवारी 2020 च्या तुलनेत जानेवारी 2021मध्ये जास्त उत्पादन झालेल्या महत्वाच्या खनिज उत्पादनामधील वाढ याप्रमाणे, ‘संहत जस्त’ (9.6%), ‘फॉस्फोरेट’ (6.1%), ‘क्रोमाईट’ (5.7%), ‘चुनखडी’ (2.5%) , ‘मॅंगनीज खनिज’(1.3%), ‘संहत तांबे’ [(-) 19.8%], ‘लिग्नाईट’ [(-) 17.8%], ‘बॉक्साईट’ [(-) 13.6%], ‘पोलाद’ [(-) 6.6%], ‘पेट्रोलियम (क्रूड)’ [(-) 4.6%], ‘संहत शिसे.’ [(-) 2.5%], ‘नैसर्गीक वायू (वापरलेलै)’ [(-) 2.1%] आणि ‘कोळसा’ [(-) 1.8%].
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1705774)
आगंतुक पटल : 151