गृह मंत्रालय
काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनरागमन
Posted On:
17 MAR 2021 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2021
जम्मू-काश्मीर सरकारने 1990 मध्ये स्थापन केलेल्या मदत कार्यालयाच्या अहवालानुसार, 1990 पासून सुरक्षेच्या कारणास्तव 44,167 काश्मिरी स्थलांतरित कुटुंबांनी काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर केल्याची नोंद आहे. यापैकी नोंदणीकृत हिंदू स्थलांतरित कुटुंबांची संख्या 39,782 आहे.
काश्मिरी स्थलांतरितांच्या पुनर्वसनासाठी पीएम पॅकेजअंतर्गत काश्मिरी स्थलांतरित तरुणांसाठी विशेष रोजगार हा एक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही वर्षांत पीएम पॅकेज अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी एकूण 3800 स्थलांतरित उमेदवार काश्मीरमध्ये परत आले आहेत. कलम 370 रद्द केल्यावर, पुनर्वसन पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी नोकरी घेण्यासाठी तब्बल 520 स्थलांतरित उमेदवार काश्मीरमध्ये परत आले आहेत. वर्ष 2021 मध्ये निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जवळपास 2,000 स्थलांतरित उमेदवार याच धोरणांतर्गत परत येण्याची शक्यता आहे.
काश्मीर खोऱ्यात काश्मिरी स्थलांतरितांचे पुनरागमन व पुनर्वसनासाठी 2008 आणि 2015 मध्ये पंतप्रधानांच्या पॅकेजेस अंतर्गत काश्मिरी स्थलांतरितांचे पुनरागमन व पुनर्वसनासाठी सरकारने धोरण तयार केले आहे.
या धोरणांचे विविध घटक इथे पाहा
ही माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लिखित उत्तरात दिली
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705597)
Visitor Counter : 349