संरक्षण मंत्रालय

भारतीय सैन्याने 130 एमएम सेल्फ प्रोपेल्ड कॅटॅपल्ट तोफा आणि 160 एमएम टॅम्पेला तोफेला सेवामुक्त केले

Posted On: 16 MAR 2021 7:35PM by PIB Mumbai

 

सर्वात प्रदीर्घ सेवा देणारी दोन तोफखाना यंत्रणा, 130 एमएम सेल्फ प्रोपेल्ड एम-46 कॅटॅपल्ट तोफा आणि 160 एमएम टॅम्पेला तोफेला आज महाजन फील्ड फायरिंग रेंज येथून  सेवामुक्त करण्यात आले. या सोहळ्यात प्रथेनुसार या तोफांमधून  अखेरचे फायरिंग करण्यात आले. यावेळी, तोफखान्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल के रवी प्रसाद आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

27 कि.मी. पेक्षा  जास्त मारक पल्ला असलेल्या 130 एमएम कॅटॅपल्टची विजयंता रणगाडा आणि 130 एमएम एम-46 तोफा या दोन विद्यमान प्रणाली सोबत यशस्वी विलीनीकरण होते. 1965आणि 1971 च्या युद्धानंतर पश्चिम सीमेवर होणाऱ्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फिरता तोफखाना यंत्रणेच्या गरजेला ही यंत्रणा पूरक होती. 1981 मध्ये या तोफांच्या समावेश भारतीय सैन्यात करण्यात आला  आणि बर्याच कारवायांमध्ये यशस्वीरित्या काम केले आहे.

1962 मधील चीनसोबत झालेल्या युद्धानंतर उत्तर सीमेवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी  शस्त्रास्त्र यंत्रणेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 9.6 किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या 160 एमएम टँपेला तोफेचा भारतीय सैन्यात समावेश करण्यात आला.  मुळात इस्त्रायली संरक्षण दलाकडून आयात केलेली ही तोफ यशस्वीरित्या लीपा खोऱ्यात आणि हाजीपिर बाऊलच्या नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आल्या आणि त्यांनी नियंत्रण रेषेच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या तोफेने 1999 च्या कारगिल युद्धामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या नवीन उपकरणांना भारतीय सैन्यात समाविष्ट करून घेण्यासाठी जवळजवळ 60 वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या या शस्त्रास्त्र यंत्रणाना सेवामुक्त करण्यात आले. 

 

 

M.Iyengar/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705240) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali