ऊर्जा मंत्रालय

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील वीज प्रसारण आणि वितरण मजबूत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली  सुधारित खर्चाच्या अंदाजांना मंजूरी

Posted On: 16 MAR 2021 5:07PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने आज राज्यांतर्गत वीज प्रसारण आणि वितरण प्रणाली मजबूत करून  अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम राज्यांच्या आर्थिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममधील प्रसारण आणि वितरण मजबूत करण्यासाठीच्या  व्यापक योजनेच्या 9129.32 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाच्या अंदाजास (आरसीई) मंजूरी दिली आहे.

ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (पीएसयू) पॉवरग्रिडच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे.

अरुणाचल प्रदेश आणि सिक्किमच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी आणि दुर्गम भागत ग्रीड कनेक्टिव्हिटी देऊन राज्यांतर्गत प्रसारण आणि वितरण पायाभूत सुविधा मजबूत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे एक विश्वासार्ह पॉवर ग्रीड तयार होईल आणि नवीन लोड केंद्रांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. अशाप्रकारे अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या दुर्गम आणि सीमावर्ती भागातील खेड्यांमधील आणि शहरांमधील मधील लाभार्थींसह सर्व प्रकारच्या ग्राहकांना ग्रीड-कनेक्ट केलेल्या विजेचा लाभ मिळेल.

या योजनेमुळे या राज्यांचा दरडोई वीज वापर वाढेल आणि एकूणच आर्थिक विकासाला हातभार लागेल.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1705146) Visitor Counter : 202