अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 49.87 कोटी लोकांना आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ (वैयक्तिक अपघात आणि पर्यटन व्यवसाय वगळता)

Posted On: 15 MAR 2021 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2021
 

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 49.87 कोटी लोकांना आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ (वैयक्तिक अपघात आणि पर्यटन व्यवसाय वगळता) मिळाल्याची माहिती भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) दिली आहे.

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

आरोग्य विमा व्यवसायामध्ये (वैयक्तिक अपघात व पर्यटन व्यवसाय वगळता) 1.4.2019 पासून 30.9.2019 पर्यंत 17.83 कोटी लोकांना विमा संरक्षण मिळाले होते त्या तुलनेत 1.4.2020 पासून 30.9.2020 पर्यंत 30.22 कोटी (तात्पुरता डेटा) लोकांना विम्याचा लाभ मिळाला आहे जो 69.8% वाढ दर्शवितो अशी माहिती आयआरडीएआयने दिल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.

सर्वसाधारणपणे, साथीच्या रोगाच्या दरम्यान आरोग्य विमा प्रीमियम मध्ये कोणतीही असामान्य वाढ झाली नाही, असे मंत्र्यांनी नमूद केले.

 
* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704930) Visitor Counter : 106


Read this release in: Telugu , English , Urdu