आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणूचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल प्रक्रिया
Posted On:
15 MAR 2021 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2021
देशातील कोरोना व इतर संसर्गजन्य आजार असलेल्या रूग्णांचा शोध/मागोवा घेण्यासाठी सरकारने बरीच पावले उचलली आहेत, ती खालीलप्रमाणे:-
एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (आयडीएसपी):- आयडीएसपीअंतर्गत सर्व राज्ये आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये देखरेख ठेवण्याची युनिट स्थापन करण्यात आली आहेत आणि संक्रमण आजारांविषयी साप्ताहिक आकडेवारीची नोंद करण्यात येत आहे. प्रशिक्षित शीघ्र कृती दलाच्या (आरआरटी) माध्यमातून आजाराच्या तीव्रतेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वाढत्या टप्प्यातला उद्रेक सुरुवातीलाच शोधून त्याला प्रतिसाद देण्यासाठी माहिती संकलित केली जाते. चीन, हाँगकाँग, तैवान इत्यादी विविध देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा मागोवा घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी कोविड -19 च्या संदर्भातही आयडीएसपीची तयारी करण्यात आली आहे.
आरोग्य सेतु अॅप हे कोविड -19 संपर्क शोध, लक्षणे ओळखण्यासाठी आणि स्वयं मूल्यांकनासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केलेले अॅप आहे. हे कोविड -19 समूह ओळखण्यास देखील मदत करते.
कोवीन अॅप हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्यायोगे संस्था कोविड -19 लसीकरण कार्यक्रमाचा आढावा ठेवू शकतात आणि भारतीय नागरिकांना कोविड-19 लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते.
रुग्णांची संख्या, पायाभूत सुविधा उपलब्धता चाचणी इ. कोविड-19 व्यवस्थापनाच्या विविध बाबींशी संबंधित राज्यांचा विशिष्ट डेटा संकलित करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-इंडिया पोर्टल आणि टेस्टिंग (चाचणी) पोर्टल विकसित केले आहे.
साथीच्या फैलावामुळे होणाऱ्या आजारांचा शोध घेऊन त्याला प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयडीएसपीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अशा उद्रेकाचा फैलाव रोखण्यासाठी आयडीएसपी अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त मनुष्यबळ, उद्रेक तपासणीसाठी शीघ्र कृती दल (आरआरटी) सदस्यांचे प्रशिक्षण, साथीच्या रोगांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळांचे बळकटीकरण, डेटा एन्ट्रीसाठी माहिती तंत्रज्ञान उपकरणे, विश्लेषण आणि माहिती वितरणाची सुविधा पुरविली जाते.
आरोग्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रस्तरीय आरोग्य जागरूकता अभियानाला ब्युरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन, दूरदर्शन, आकाशवाणी याद्वारे माध्यम प्रसिद्धी दिली जाते. आरोग्य नागरी अभियान (एसएनए) अंतर्गत या मंत्रालयाद्वारे गेल्या पाच वर्षात झालेल्या खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-
Year
|
Expenditure
(Rs. in crore)
|
2015-16
|
223.07
|
2016-17
|
251.08
|
2017-18
|
188.47
|
2018-19
|
226.57
|
2019-20
|
132.20
|
आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Thakur/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704873)
Visitor Counter : 187