रेल्वे मंत्रालय

रेल्वे पार्सल व्यवस्थापन प्रणालीत आमूलाग्र परिवर्तन

Posted On: 14 MAR 2021 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2021

भारतीय रेल्वेची पार्सल सेवा विविध स्थानकांवरून छोट्या कन्साईनमेंटसाठी वाहतूक सुविधा पुरवत आहे. छोटे व्यवसाय आणि व्यापारी (विशेषत: लहान शहरे आणि गावांमधील) मोठी   शहरे आणि उत्पादन केंद्रांमधून आपला माल व्यवसायाच्या ठिकाणी वेगवान, विश्वासार्ह आणि स्वस्त मार्गाने पोहचवण्यासाठी  या सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर  करतात. सामान्य माणूस देखील या सेवांचा वापर घरगुती सामान, फर्निचर, दुचाकी इत्यादींच्या वाहतुकीसाठी करतात - ज्यासाठी पार्सल सेवा ही सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.

पार्सलचे शुल्क केवळ वजन आणि आकाराच्या आधारे आकारले जाते, वस्तूंच्या प्रकारानुसार नाही.

पार्सल व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण:

पार्सल व्यवस्थापन प्रणालीचे संगणकीकरण 84 ठिकाणांवरून दुसऱ्या टप्प्यात आणखी 143 ठिकाणापर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात 523 ठिकाणांपर्यंत विस्तारण्यात येत आहे. यामुळे पार्सल प्रणालीत पुढील वाढीव  वैशिष्ट्ये असतील-

  • पार्सल व्यवस्थापन प्रणालीच्या सार्वजनिक संकेतस्थळासाठी सुधारित युझर फ्रेंडली  इंटरफेस www.parcel.indianrail.gov.in  
  • पीएमएसमध्ये पार्सलसाठी 120  दिवसांचे आगाऊ आरक्षण  करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • पीएमएस संकेतस्थळावर ऑनलाइन ई-फॉरवर्डिंग नोट मॉड्यूलवर पार्सल जागेसाठी  उपलब्धता दाखवली जाते .
  • संगणकीकृत काउंटरमार्फत स्थानकांवरील  पार्सल कार्यालयात पार्सल / सामानाचे आरक्षण करणे आणि इलेक्ट्रॉनिक वजन प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे वजन करणे .
  • पार्सलच्या ट्रॅकिंगसाठी प्रत्येक मालावर बारकोडिंग, जीपीआरएस नेटवर्कद्वारे बारकोड स्कॅनिंगद्वारे पॅकेजेस स्थिती अद्ययावत करणे.
  • आरक्षणाच्या वेळी देण्यात आलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पार्सल बुकिंग, लोडिंग, अनलोडिंगपासून प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) एसएमएस पाठवणे.
  • ग्राहकांसाठी अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पार्सल संकेतस्थळ www.parcel.indianrail.gov.inवर पॅकेजेस ट्रॅक करणे .
  • आरक्षणाच्या वेळी जीएसटीएन पोर्टलद्वारे प्रेषकाची (sender) ऑनलाईन जीएसटीएन पडताळणी.

 

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704729) Visitor Counter : 143