राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती 13 ते 15 मार्च दरम्यान उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर

Posted On: 12 MAR 2021 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2021

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 13 ते  15  मार्च 2021 दरम्यान उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत.

राष्ट्रपती 13 मार्च 2021 रोजी दुपारी वाराणसीला पोहोचतील.

14 मार्च 2021 रोजी राष्ट्रपती सोनभद्र जिल्ह्यातील चापकीला भेट देतील. तिथे ते वनवासी समागममध्ये सहभागी होतील आणि सेवा कुंज आश्रमाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करतील.

15 मार्च 2021 रोजी वाराणसीत दैनिक जागरण द्वारा आयोजित गंगा, पर्यावरण आणि भारतीय संस्कृती या मुद्द्यांवर जागरण मंचाच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपती मार्गदर्शन करतील.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704470) Visitor Counter : 141