रसायन आणि खते मंत्रालय
औषधांसाठीचा महत्वाचा प्राथमिक कच्चा माल उत्पादकता संलग्न सवलती (PLI) योजनेअंतर्गत तयार करण्यास मान्यता
Posted On:
11 MAR 2021 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2021
भारतातील औषधनिर्माण क्षेत्र हे आकारमानानुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. जगातील अनेक विकसित अर्थव्यवस्था, जसे अमेरिका आणि युरोपीय महासंघात भारतीय औषधनिर्माण क्षेत्राचे लक्षणीय अस्तित्व जाणवते. किफायतशीर दरातल्या औषधांसाठी, विशेषतः जेनेरिक प्रकारच्या औषधांसाठीही हे क्षेत्र ओळखले जाते. मात्र, असे असले तरी हे क्षेत्र आपल्या उत्पादनांच्या कच्च्या मालासाठी बव्हंशी आयातीवर अवलंबून आहे.
या महत्वाच्या आणि मोठ्या प्रमाणातील औषधांमधील घटकांसाठी, प्राथमिक कच्चा माल, औषधे तयार करण्यासाठी लागणारे महत्वाची माध्यमे,औषधांसाठीची इतर महत्वाची उत्पादने (APIs) भारतातच त्यात होण्यासाठीची आत्मनिर्भरता यावी आणि निर्यातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, या दृष्टीने, औषधनिर्माण विभागासाठीही उत्पादकता संलग्न सवलत(PLI) योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत, वर्ष 2020-21 ते 2029-30 या काळासाठी पर्यावरणपूरक देशांतर्गत उत्पादन क्षेत्र तयार करण्यासाठी 6,940 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यातील चार लक्ष्यीत वर्गातल्या 36 उत्पादनांसाठी 215 आवेदनपत्रे प्राप्त झाली होती. यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या अर्जांवर 90 दिवसांच्या आत म्हणजेच 28 फेब्रुवारी 2021पर्यंत प्रक्रिया करुन निर्णय घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, 4623.01 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या 19 आवेदनपत्रांना लक्ष्यीत वर्ग 1, 2 आणि 3 अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
लक्ष्यीत वर्ग 4 अंतर्गत, पात्र असलेल्या 23 उत्पादनांसाठी 174 आवेदनपत्रे प्राप्त झाली होती. या वर्गात- इतर रासायनिक संयोग प्रक्रिया-आधारित प्राथमिक उत्पादने/औषधांसाठीची माध्यमे/ एपीआय इत्यादींचा समावेश होतो. या 174 आवेदनपत्रांपैकी 11 पात्र उत्पादनांसाठी 79 आवेदने प्राप्त झाली होती. अधिकारप्राप्त समितीच्या 27 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत, निवडीच्या निकषांनुसार, खालील कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्यांनी प्रस्तावित वार्षिक उत्पादन क्षमतेच्या किमान/किमानपेक्षा अधिक उत्पादनाची हमी दिली असून आवश्यक ते निकषही पूर्ण केले आहेत. या कंपन्यांची यादी खालीलप्रमाणे
तक्ता :
Sl.No.
|
Name of approved Applicant
|
Name of Eligible Product
|
Committed Production Capacity
(in MT)
|
Committed Investment
(in Rs. crores)
|
1.
|
M/s Anasia Lab Private Limited
|
Meropenem
|
08
|
26.12
|
2.
|
M/s Rajasthan Antibiotics Limited
|
48
|
28.25
|
3.
|
M/s Centrient Pharmaceuticals India Private Limited
|
Atorvastatin
|
180
|
137.74
|
4.
|
M/s Anasia Lab Private Limited
|
Olmesartan
|
75
|
27.09
|
5.
|
M/s Andhra Organics Limited
|
75
|
30.50
|
6.
|
M/s Solana Life Sciences Private Limited
|
Artesunate
|
40
|
20.00
|
7.
|
M/s RMC Performance Chemicals Private Limited
|
Aspirin
|
1500
|
12.00
|
8.
|
M/s Surya Remedies Private Limited
|
Ritonavir
|
20
|
20.00
|
-
|
M/s Honour Lab Limited
|
Lopinavir
|
49
|
31.01
|
-
|
M/s Hindys Lab Private Limited
|
Acyclovir
|
525
|
30.37
|
-
|
M/s Dasami Lab Private Limited
|
Carbamazepine
|
260
|
30.28
|
-
|
M/s Dasami Labs Private Limited
|
Oxcarbazepine
|
195
|
25.58
|
-
|
M/s Hetero Drugs Limited
|
195
|
19.00
|
-
|
M/s Hazelo Lab Private Limited
|
Vitamin B6
|
70
|
21.53
|
या प्रकल्पांच्या उभारणीसाठी, एकूण गुंतवणूक 459.47 इतकी असण्याची कटिबद्धता व्यक्त करण्यात आली असून त्यातून 3,715 रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. या कंपन्यांचे व्यावसायिक उत्पादन एक एप्रिल 2023 पासून सुरु होणे अपेक्षित आहे.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704180)
Visitor Counter : 316