पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

देशांतर्गत तेल आणि वायू निर्मिती वाढवण्यासाठी राबवलेले उपक्रम

Posted On: 10 MAR 2021 6:05PM by PIB Mumbai

 

देशात तेल आणी वायूनिर्मिती वाढवण्यासाठी सरकार राबवत असलेले तात्कालिक आणि दीर्घकालीन उपक्रम खालीलप्रमाणे आहेत:-

1. दीर्घकालीन उपक्रम

  • हायड्रोकार्बन साठे शोधांचे जलद रोखीकरण करण्यासाठी(व्यावहारिक उपयोग) उत्पादन शेअरिंग करारांतर्गत सवलत, विस्तार आणि स्पष्टीकरण विषयक धोरण, 2014.
  • शोधलेले लघु क्षेत्र धोरण,2015.
  • हायड्रोकार्बन उत्खनन आणि परवाना धोरण, 2016.
  • उत्पादन शेअरिंग कराराच्या विस्तारीकरणाचे धोरण, 2016 आणि 2017.
  • कोळसा खाणीतील मिथेन वायूचे जलद रोखीकरण करण्याची धोरण, 2017
  • राष्ट्रीय माहिती (डेटा) भांडारची स्थापना, 2017.
  • नदीच्या गाळयुक्त खोऱ्यातील बिगर-मूल्यांकित क्षेत्रांचे मूल्यांकन 2017
  • हायड्रोकार्बन स्त्रोतांचे पुनर्मूल्यांकन, 2017
  • पूर्व एनईएलपी अर्थात राष्ट्रीय उत्खनन आणि परवाना धोरण येण्यापूर्वी आणि एनईएलपी (राष्ट्रीय उत्खनन आणि परवाना धोरण) क्षेत्रात उत्पादन शेअरिंग करारांची अंमलबजावणी सुव्यवस्थितपणे करण्यासाठी धोरण आराखडा, 2018.
  • तेल आणि वायू वाढीव उत्खननाच्या पद्धतींना प्रोत्साहन आणि सवलती देण्यासाठीचे धोरण, 2018.
  • सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पादन शेअरिंग करार, कोळसा खाणीतील मिथेन करार आणि नामांकन क्षेत्रानुसार, उत्खनन आणि अपारंपरिक हायड्रोकार्बन चे उत्खनन करण्यासाठीचा धोरण आराखडा, 2018
  • कोल इंडिया लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्यांना भाडेपट्टीवर दिलेल्या कोळसा खाण क्षेत्रातील मिथेन उत्खननासाठीचा धोरण आराखडा
  • देशांतर्गत तेल आणि वायू उत्पादन वाढवण्यासाठी हायड्रोकार्बन उत्खनन आणि परवाना धोरणात सुधारणा, 2019

 

2. तात्कालिक सुधारणा

  • सध्या असलेल्या शोधक्षेत्रांचे जलद रोखीकरण
  • आयओआर आणि ईओआर तंत्रज्ञानाचा वापरा करून रिकव्हरीत सुधारणा करणे.
  • जुन्या, पडीक इंधन विहिरींचे पुनरुज्जीवन.
  • इंधन विहिरींचे इन्फील ड्रिलिंग करणे.
  • सुविधा आणि इतर पायाभूत व्यवस्थांचे नूतनीकरण
  • सेवा करार आणि आऊटसोर्सिंग च्या माध्यमातून किनारपट्टीवरील छोट्या आणि उपेक्षित खाणींचे रोखीकरण करणे.
  • सध्या असलेल्या जुन्या क्षेत्रांचा पुनर्विकास आणि नव्या/उपेक्षित क्षेत्रांचा विकास.
  • निवडक क्षेत्रांमध्ये काही सुयोग्य अशा तंत्रज्ञानांचा वापर

 

गेल्या चार वर्षात भारतात उत्पादित झालेल्या कच्च्या तेलाची माहिती खालील तक्त्यात :

वर्ष

2016-17

2017-18

2018-19

2019-20

कच्च्या तेलाचे उत्पादन (MMT दसलक्ष मेट्रिक टनमध्ये )

36.01

35.68

34.20

32.17

 

जुन्या क्षेत्रांमध्ये असलेली पाण्याची कमतरता आणि नैसर्गिक घट झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याशिवाय, पश्चिम किनाऱ्यावरील काही प्रकल्प पूर्ण होण्यात झालेला विलंब, विहिरी, प्लॅटफॉर्म,पाईपलाईन अकस्मात बंद पडणे आणि आसाममध्ये झालेले बंद आणि अडथळे यांचाही परिणाम उत्पादनांवर झाला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

****

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1703889) Visitor Counter : 133


Read this release in: English , Urdu , Bengali , Punjabi