श्रम आणि रोजगार मंत्रालय

असंघटित क्षेत्राला आर्थिक सहाय्य

Posted On: 10 MAR 2021 5:06PM by PIB Mumbai

 

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत गरिबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 1.70 लाख कोटी रुपयांचे पंतप्रधान गरीब कल्याण योजनामदत पॅकेज जाहीर केले होते. सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजने (पीएमजीकेवाय) अंतर्गत विविध उपाययोजना केल्या आहेत. यातील काही खालीलप्रमाणे आहेत:

          प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने  (पीएमजीकेवाय) अंतर्गत तीन महिन्यांसाठी, दरमहा 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ मोफत वितरीत केली; पीएमजीकेवाय योजनेचा कालावधी नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत वाढविण्यात आला होता.

      महिला जनधन खातेधारकांसाठी तीन महिन्यांसाठी दरमहा 500 रुपयांची आर्थिक मदत.

      मनरेगाचे वेतन 182 रुपयांवरून 202 रुपये करण्यात आले, याचा लाभ 13.62 कोटी कुटुंबांना झाला.

      3 कोटी गरीब ज्येष्ठ नागरिक, गरीब विधवा आणि गरीब दिव्यांगाना 1000 रुपयांची आर्थिक मदत

आत्मनिर्भर आर्थिक पॅकेजचा भाग म्हणून सरकार सत्तावीस लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे वित्तीय प्रोत्साहन देत आहे. देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी आणि तामिळनाडूसह सर्व प्रदेश आणि क्षेत्रासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये विविध दीर्घकालीन योजना / कार्यक्रम / धोरणांचा समावेश आहे

सामाजिक सुरक्षेसह नवीन रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि कोविड-19 साथीच्या आजारात रोजगार गमावलेल्यांसाठी पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय) सुरु केली.

 

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

*****

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703821) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Bengali , Punjabi