संरक्षण मंत्रालय

डीआरडीओ ने विकसित केलेल्या शस्त्रास्त्र प्रणालींची यशस्वी चाचणी

Posted On: 10 MAR 2021 3:00PM by PIB Mumbai

 

गेल्या वर्षभरात डीआरडीओ म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेने 28 चाचण्या यशस्वी केल्या आहेत. डीआरडीओने  सैन्यदलांकडे सुपूर्द केलेल्या महत्वाच्या शस्त्रास्त्र आणि इतर प्रणालींमध्ये : अस्त्र- दृष्टीच्या टप्प्यापलीकडे वेध घेणारी क्षेपणास्त्र प्रणाली, 10 मीटर लघु पल्ल्याची सांधणारी प्रणाली, भारतीय मेरिटाईम परिस्थितीनुसार जागृत होणारी प्रणाली (IMSAS), अवजड वजनाचे टॉर्पेडो (HWT)वरुणास्त्र, सीमा टेहळणी प्रणाली (BOSS) आणि अर्जुन Mk-1A. डीआरडीओ साठीच्या विकास आणि निर्मिती भागीदार धोरणाअंतर्गत या प्रणाली विकसित करण्यात सुरुवातीपासून म्हणजेच प्रणाली विकसित होण्यापासून ते ती सैन्यदलांकडे सुपूर्द करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात उद्योग क्षेत्रांचा सहभाग होता.

डीआरडीओ  ही संशोधन आणि विकास संघटना आहे. या अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या सर्व प्रणाली भारतीय उद्योगांनी निर्मित केल्या आहेत, यात सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही उद्योगांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात अशा सहकार्यातून विकसित करण्यात आलेल्या काही प्रणाली म्हणजे: अत्याधुनिक टोड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS), वाढीव पल्ल्याची पिनाक प्रणाली आणि गाईडेड पिनाक रॉकेट प्रणाली , 10 मीटर लघु पल्ल्याची सांधणारी प्रणाली, भारतीय मेरिटाईम परिस्थितीनुसार जागृत होणारी प्रणाली (IMSAS), अवजड वजनाचे टॉर्पेडो (HWT)वरुणास्त्र, सीमा टेहळणी प्रणाली (BOSS) आणि अर्जुन Mk-1A इत्यादी.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत खासदार रिता बहुगुणा जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नाला हे लिखित उत्तर दिले.

 

M.Chopade/R.Aghor/P.Kor

 

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703794) Visitor Counter : 194


Read this release in: English , Urdu , Punjabi