विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

महिलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्या समोरील आव्हानांकडे ध्यान देण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांनी केले अधोरेखित


पुढील पिढ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व तयार करणे आणि विज्ञान तंत्रज्ञान तसेच नवनिर्मिती या क्षेत्रात महिलांना नेतृत्व करायला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय: प्राध्यापक आशुतोष शर्मा, सचिव विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग

Posted On: 09 MAR 2021 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2021

महिलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्या समोरील आव्हानांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे,नुकत्याच झालेल्या भारत आणि जपान यांनी संयुक्तपणे साजऱ्या  केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या समारंभात तज्ञांनी अधोरेखित केले.

लिंगभाव असमानता हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे आणि त्यावर अनेक  बाजूंनी आणि विविध मंचावरून चर्चा व्हायला हवी. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला नेतृत्व ही यंदाच्या  आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना  संदर्भ आणि  आषय अशा दोन्ही अर्थानी   समजावून घ्यायला हवी , असे भारताचे जपानमधील राजदूत श्री. संजय कुमार वर्मा म्हणाले .  किरण विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारतीय दूतावास,जपानमधील दूतावास टोकियो ,भारत सरकार,जपानमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था(एजन्सी), आणि जपान सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.

सायकल एकाच चाकावर चालू शकत नाही ,याच्याशी लिंगभाव असमानतेची तुलना करत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे(डीएसटी) सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा म्हणाले,की  देश आणि समाज यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी महिला आणि पुरुष या दोघांचाही सहभाग आवश्यक आहे. भारतातील महिलांसमोर सांस्कृतिक आव्हानांसह अनेक आव्हाने आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग विविध उपक्रमांद्वारे त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.पुढील पिढ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व तयार करणे  आणि विज्ञान तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीया क्षेत्रात  महिलांना नेतृत्व करायला प्रोत्साहन  देणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही 'गतीअर्थात संस्थात्मक बदलांसाठी लिंगभाव  उन्नती (GATI, Gender Advancements for Transforming Institutions)या योजनेचा प्रारंभ केला आहे, ज्यामुळे संस्थात्मक पातळीवर परीवर्तन घडून येईल. आम्हाला महिलांना  शिक्षण, उद्योग, संशोधन आणि विकास या क्षेत्रांत आत्मविश्वास आणि संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, नवनिर्माण यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे आणि महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतांचा शोध घेण्यासाठी मदत करायची आहे.

जपान सरकारच्या लिंगभाव समानता कार्यालयाच्या( जेंडर इक्वालिटी ब्युरो), कॅबिनेट  कार्यालयाचे महासंचालक टोमोको हायाशी यांनी जपानमधील महिला, गरीब विशेष ज्यांच्यावर कोविड-19 चे गंभीर परिणाम  झाले आहेत, याकडे लक्ष वेधले.एकल पालक कुटुंबांमध्ये वाढ झाली आहे,अतीव  नैराश्य, घरगुती हिंसाचार,लैंगिक अत्याचार या समस्या वाढल्या आहेत.  जपान सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याचे ठरविले आहे आणि महिलांना त्यांच्या लैंगिकतेमुळे त्रास होऊ नये यासाठी विविध पावले उचलली आहेत.

जपान सरकारच्या जपान विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. मिचिनारी हामागुची म्हणाले की लिंगभाव असमानता दूर करण्याचे प्रयत्न आधीपासूनच सुरू झाले असून भविष्यात त्यांचा वेग अधिक वाढविण्यात येईल. आपण महिला संशोधकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आम्ही हुशार महिला संशोधकांसाठी पुरस्कार द्यायला आरंभ केला आहे आणि नवीन प्रतिभावंत महिलांचा शोध घेण्यात यशस्वी झालो आहोत,असेही डॉ. मिचिनारी हामागुची यांनी सांगितले.  

जपान सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण कार्यालय,एमईएक्सटीच्या (MEXT) रणनीती कार्यक्रम विभागाचे म्हणजेच स्ट्रॅटेजिक डिव्हिजन प्रोग्रॅम्सचे (संशोधन आणि यंत्रणा परीवर्तन ) संचालक श्री. सानो टाकिको यांनी अनेक वर्षांपासून घडवून आणलेल्या परीवर्तनावर भाष्य केले.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या किरण आणि इन्स्पायर(Kiran& INSPIRE) विभागाचे  प्रमुख आणि सल्लागार डॉ. संजय मिश्रा यांनी महिलांच्या कमी प्रतिनिधीत्वाची समस्या सोडविण्यासाठी स्टेम (STEM) या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सुरू केलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. भारत सरकार आणि सर्व मंत्रालयांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग आदर्शवत  झाला आहे. तथापि  आम्ही माहितीचे  विश्लेषण केले तर स्टेम अंतर्गत महिलांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसल्याचे दिसून येते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी विशिष्ट उपक्रम सुरू केले आहेत.टिफाक(TIFAC) या डीएसटी अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थेने निमंत्रित केलेल्या, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात डब्ल्यूओएस-सी , प्रोग्रॅम ऑफ डीएसटी मधील  100 यशस्वी महिलांच्या यशोगाथेच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

 

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703523) Visitor Counter : 468