आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राजस्थानमध्ये कोविड लसच्या डोसची कमतरता नाही


सर्व राज्य/केंद्र शासित प्रदेशांमधील लसीच्या पुरवठ्यावर केंद्रसरकारची देखरेख

Posted On: 09 MAR 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2021

राजस्थानमध्ये कोविड-19 लसींच्या डोसची कमतरता असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.

सध्या राज्यामध्ये कोविड-19 लशीची कोणतीही कमतरता नाही. राजस्थानला 37.61 लाख डोस  उपलब्ध करून देण्यात आले असून काल रात्रीपर्यंत त्यातील केवळ 24.28 लाख डोस लसीकरणासाठी  वापरण्यात आले आहेत.

केंद्र सरकार नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लस पुरवठा उपलब्धतेवर लक्ष ठेवून असून  त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि वापराच्या पद्धतीनुसार त्यांना डोस उपलब्ध करून दिले जात आहेत.

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1703494) Visitor Counter : 162