संरक्षण मंत्रालय

तुर्कमेनिस्तानच्या विशेष सैन्यदलाला भारतीय विशेष सैनिकदल प्रशिक्षण केंद्रात कॉम्बॅट फ्री फॉलचे प्रशिक्षण

प्रविष्टि तिथि: 04 MAR 2021 4:28PM by PIB Mumbai

 

भारतीय विशेष सैन्यदलाने आपली वर्षानुवर्षांची व्यावसायिकता, कामातील नैपुण्य आणि त्याग यामुळे जगातील एक उत्कृष्ट विशेष सैन्यदल म्हणून आदर व नाव कमावले आहे. अमेरीका, ऑस्ट्रेलिया, मध्य आशियातील तसेच मध्य पूर्वेकडील राष्ट्रांची सैन्यदले भारतीय सैन्यदलाबरोबर युद्धाचे प्रशिक्षण घेण्याची  इच्छा सातत्याने व्यक्त करतात.  याला प्रतिसाद म्हणून भारतीय विशेष सैन्यदल या मित्रराष्ट्रांशी युद्धसराव प्रशिक्षण वाढवत असते.

तुर्कमेनिस्तानच्या विशेष सैन्यदलाच्या विनंतीवरून, भारतीय लष्कराच्या  विशेष सैनिक प्रशिक्षण संस्थेने तुर्कमेनिस्तानच्या विशेष सैनिकांमधील पॅराट्रूपर्ससाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे. भारतीय सैन्यदलाची विशेष सैनिक प्रशिक्षण संस्था ही भारतीय सैन्यदलाच्या विशेष सैनिक दलाला प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे. पॅराट्रूपर्सना देण्यात येणारे कॉम्बॅट फ्री फॉलचे प्रशिक्षण हे  तुर्कमेनिस्तानच्या विशेष सैन्यदलाची पारंगतता वाढवण्याच्या दिशेने त्यांच्या आवश्यकतेनुसार दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील आरंभीचा भाग आहे.

****

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1702458) आगंतुक पटल : 319
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Malayalam