वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतात एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान 67.54 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी थेट परदेशी गुंतवणूक


2020-21 च्या पहिल्या नऊ महिन्यांत थेट परदेशी गुंतवणुक भांडवलामध्ये 40 टक्क्यांची (51.47 अब्ज अमेरिकन डॉलर्स) वाढ

Posted On: 04 MAR 2021 4:18PM by PIB Mumbai

 

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी थेट परदेशी गुंतवणूक अत्यंत महत्वाचा घटक असून अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कर्जास्वरूपात नसलेला मोठा आर्थिक स्त्रोत आहे. त्यामुळेच, गुंतवणूक स्नेही आणि सहज अमलात आणता येणारे थेट परदेशी धोरण ठरवणे हा सरकारचा प्रयत्न असतो. यामागचा उद्देश थेट परदेशी धोरण अधिक सुलभ करत त्यातील अडथळे दूर करणे हाच आहे. याच दिशेने सरकारने गेल्या साडेसहा वर्षात उचललेल्या पावलांची फळे आता मिळू लागली आहेत. देशात सातत्याने थेट परदेशी गुंतवणुकीचा वाढता ओघ, त्याचेच द्योतक आहे.थेट परदेशी गुंतवणुकविषयक  धोरण अधिकाधिक उदार आणि सुलभ करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारने विविध क्षेत्रात एफडीआय सुधारणा केल्या आहेत.

याच उपाययोजना आणि सुधारणांमुळे भारतात, सातत्याने थेट परदेशी गुंतवणूक होत आहे. भारताच्या थेट परदेशी गुंतवणूकीसंदर्भात जाणवलेली काही तथ्ये, भारत, हा जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांसाठी कसा पसंतीचा देश ठरला आहे, हेच सूचित करणारे आहेत:

  • भारतात एप्रिल ते डिसेंबर 2020 या काळात 67.54  अब्ज डॉलर्स थेट परदेशी गुंतवणूक झाली.  या वित्तीय वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत झालेली ही आजवरची सर्वाधिक गुंतवणूक असून 2019-20  मधील याच कालावधीच्या तुलनेत(55.14 अब्ज डॉलर्स). त्यात 22%  टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • वित्तीय वर्ष 2020-21 च्या पहिल्या नऊ महिन्यांत थेट परदेशी गुंतवणुकीच्या भांडवलाचा ओघही गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत (36.77 अब्ज डॉलर्स) 40% नी वाढला.  
  • वित्तीय वर्ष 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीत (26.16 अब्ज डॉलर्स)  गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत (19.09 अब्ज डॉलर्स) 37% वाढ झाली आहे.
  • या थेट परदेशी गुंतवणुकीमुळे (9.22 अब्ज डॉलर्स)  डिसेंबर 2020 या महिन्यात 24% सकारात्मक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. 2019 च्या डिसेंबर महिन्यात ही गुंतवणूक 7.46 अब्ज डॉलर्स इतकी होती. 

****

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702455) Visitor Counter : 277