आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयसीएमआर आणि भारत बायोटेक द्वारा विकसित कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीने 81% परिणामकारकता दाखवली
Posted On:
03 MAR 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) च्या भागीदारीसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीने कोविड रोखण्यात 81% परिणामकारकता दाखवली आहे.
नोव्हेंबर 2020 च्या मध्यावधीत आयसीएमआर आणि बीबीआयएलने संयुक्तपणे सुरू केलेल्या तिसऱ्या टप्प्यात 21 ठिकाणी एकूण 25,800 व्यक्तीची चाचणी घेण्यात आली. डीसीजीआयने मंजूर केलेल्या प्रोटोकॉलनुसार विश्लेषण केलेल्या 81% च्या अंतरिम परिणामकारकतेचा कल, इतर जागतिक आघाडीच्या लसींइतका प्रभावी होता.
“आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्णपणे स्वदेशी कोविड -19 लसीचा निर्मितीपासूनचा प्रवास, प्रतिकूल परिस्थितीत जागतिक सार्वजनिक आरोग्य समुदायासमोर उभे राहण्याची आणि आत्मनिर्भर भारतची अपार शक्ती दाखवतो. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “जागतिक लस बाबतीत महासत्ता म्हणून भारताच्या उदयाचा हा देखील एक पुरावा आहे.”
कोवॅक्सिन ही पहिली कोविड -19 प्रतिबंधक लस आहे जी संपूर्णपणे भारतात विकसित केली गेली आहे.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702317)
Visitor Counter : 322