वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक राष्ट्र, एक बाजारपेठचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाच्या एकत्रिकरणावर भर दिला
पायाभूत क्षेत्रासाठी आमच्या सरकारचे 3 मंत्र हे आहेत: सुधारणा, निर्मिती आणि लोकार्पण : केंद्रीय मंत्री पियुष गोयल
मेरी टाइम इंडिया समिट 2021 ला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले संबोधित
Posted On:
03 MAR 2021 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
एक राष्ट्र, एक बाजारपेठचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या साध्य करण्यासाठी आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी वाणिज्य व उद्योग, रेल्वे आणि ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाच्या एकत्रिकरणावर आज भर दिला. वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आम्ही बहुउद्देशीय -मॉडेल लॉजिस्टिक उपाययोजना शोधण्याच्या दिशेने काम करत आहोत असे गोयल म्हणाले. ते आज मेरी टाइम इंडिया समिट 2021 ला संबोधित करत होते.
‘सेवा प्रदात्यांनी’ या संधींचा उपयोग करून ‘ज्ञान प्रदाते’ व्हावे असे आवाहन गोयल यांनी सर्व भागधारकांना केले. जर आपण रोबोटिक्स, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषक सारख्या तंत्रज्ञान आधारित उपाययोजनांचा पुन्हा शोध लावला तर आपले क्षेत्र (SAFE) सुरक्षित अर्थात शाश्वत (Sustainable), उत्साही (Agile), भविष्यवादी (Futuristic) आणि कार्यक्षम (Efficient) होईल, असे मंत्री म्हणाले.
पंतप्रधानांनी सुरू केलेले मेरीटाईम इंडिया 2030 व्हिजन हे आमच्या सरकारचे प्राधान्य अधोरेखित करते. विविध बंदर प्रकल्पांत केलेल्या 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीमुळे या क्षेत्रात 20 लाख नवीन रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. सागरमाला प्रकल्पातील गुंतवणूकीमुळे आपल्या सागरी पायाभूत सुविधांना चालना मिळेल आणि मालवाहतूक कॉरिडॉरचा विस्तार होईल,” असे मंत्री म्हणाले.
“आपण तिहेरी इंजिनसह एकत्र काम करूया: - केंद्र सरकारचे इंजिन - राज्य सरकारचे इंजिन – आपल्या बळकट सागरी क्षेत्राचे इंजिन. भारतातील विकास आणि वृद्धीच्या इंजिनाची भरभराट होऊ दे,” असे मंत्री म्हणाले.
मेरीटाइम इंडिया समिट 2021 हा आमच्या मालवाहतुकीवरील अवाढव्य खर्चाविरूद्धच्या विजयाची सुरुवात आहे, सागरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त करण्याच्या दिशने आमचा हा विजय आहे आणि लाखो बंधू-भगिनींना नोकरी मिळवून देण्याच्या दिशेने आमचा हा विजय असेल असे गोयल म्हणाले.
* * *
S.Tupe/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702314)
Visitor Counter : 255