रसायन आणि खते मंत्रालय

जनऔषधी दिवस आठवड्याचा तिसरा दिवस आज साजरा


युवा पिढीसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 03 MAR 2021 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021

 

जनऔषधी दिवस सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आज बीपीपीआय अर्थात भारतीय औषध सार्वजनिक उपक्रम विभाग, जनऔषधी मित्र आणि जनऔषधी केंद्र मालक यांच्या पथकाने आज देशात विविध ठिकाणी 'टीच देम यंग' या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाअंतर्गत बीपीपीआयच्या अधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये आणि संस्थांना भेट देऊन सहभागींशी संवाद साधला. त्यांना जनऔषधी बाबत तसेच प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेतील उद्योजकता संधींबाबत अवगत करण्यात आले.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, जनऔषधी केंद्रात कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या विविध उत्पादनांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी आरोग्य आणि स्वच्छता शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारतर्फे सुविधा सॅनिटरी नॅपकिन्स (27.08.2019)  एक रुपया प्रति पॅड याप्रमाणे पुन्हा सुरू  केल्याची माहिती महिला विद्यार्थ्यांना देण्यात आली.  सरकारच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे  भारतातील महिलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत मिळू शकेल. आजही अनेक महिला सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत परवडणारी  नसल्यामुळे मासिक पाळीदरम्यान घातक, अस्वच्छ साधनांचा वापर करतात. जन औषधी सुविधा देशभरातील  7,400 हून अधिक पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजना केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली जात आहे. 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत या केंद्रांच्या  माध्यमातून 11.18 कोटींपेक्षा अधिक पॅड विकली गेली.

तिसरा जनऔषधी दिवस 7 मार्च, 2021 ला असून एक मार्चपासून जन औषधी दिवस सप्ताह साजरा केला जात आहे. सप्ताहाअंतर्गत आरोग्य शिबिरे, परिसंवाद, टीच देम यंग, सुविधा से सन्मान अशा विविध उपक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या जन औषधी दिवसाची संकल्पना 'सेवाही - रोजगारही ' अशी आहे.


* * *

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702312) Visitor Counter : 163


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi