संरक्षण मंत्रालय

वित्तीय वर्ष 2020-21 साठी एमडीएलने 92.56 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश दिला

Posted On: 03 MAR 2021 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी  3 मार्च  2021 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) कडून वित्त वर्ष 2020-21 साठी 92.56 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांशाचा धनादेश स्वीकारला. एमडीएलचे  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऍडमिरल  नारायण प्रसाद (निवृत्त) यांनी सचिव (संरक्षण उत्पादन) राज कुमार यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्र्यांकडे  हा धनादेश सुपूर्द केला.

या लाभांशासह, एमडीएलने वित्त  वर्ष 2020-21 दरम्यान केंद्र  सरकारला 138.73 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. यात वित्तीय वर्ष 2019-20 साठी 46.17  कोटी रुपयांचा अंतिम लाभांश समाविष्ट आहे. कंपनीने वित्त वर्ष  2020-21 साठी भाग भांडवलाच्या 54.10 टक्के म्हणजे 109.11 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे,  सरकारी हिस्सा. 84.83 टक्के आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकानी राजनाथ सिंह यांना 10 मार्च 2021 रोजी ताफ्यात सामील होणाऱ्या  स्कॉर्पिन पाणबुडी करंज बाबत तसेच प्रोजेक्ट पी -15 बीच्या विशाखापट्टणम या  पहिल्या जहाजाच्या समुद्री चाचण्या सुरू करण्याबाबत माहिती दिली.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702294) Visitor Counter : 241


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi