रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेंना स्थानकांवरील विश्रमालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यास मान्यता दिली
कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक परिस्थितीचा देखील विचार करावा
कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ही सोय बंद केली होती
Posted On:
03 MAR 2021 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वेंना कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानकांवरील विश्रमालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. याआधी रेल्वे मंडळाने आयआरसीटीसी द्वारे व्यवस्थापित हॉटेल, विश्रमालय आणि रेल यात्री निवास पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
सध्या, आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विविध विशेष एक्स्प्रेस / प्रवासी गाड्या सेवा सुरू केल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून रेल्वेने, सरकारच्या प्रोटोकॉलचे पालन करून स्थानकांवरील विश्रमालय सुरू करण्याचे ठरविले आहे. कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ही सोय बंद केली होती.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702291)
Visitor Counter : 231