रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

वाहन उत्पादकांनी पर्यायी इंधन सुलभतेसाठी स्वदेशी वाहनांची निर्मिती करावी असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वाहन उत्पादकांना निर्देश

Posted On: 02 MAR 2021 8:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

 

इथॅनॉलसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करू शकतील अशा इंधनसुलभ स्वदेशी इंजिनांच्या उत्पादनाला प्राधान्य देण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग नितीन गडकरी यांनी कार उत्पादकांना केले आहे. सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM ) च्या प्रतिनिधिमंडळाची आज गडकरी यांच्यासोबत बैठक झाली. इथेनॉल देशात सहज उपलब्ध होऊ लागले असून दुचाकी वाहनांकडून 70% पेक्षा जास्त गॅसोलीन वापर सुरू असल्याचे सांगून गडकरी यांनी फ्लेक्स इंधन वाहनांसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली.

उद्योग अजूनही कोविडच्या परिणामातून सावरत आहे आणि ग्राहकांकडून पुरेशी मागणी नसल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेने केलेल्या, बीएस 6 सीएएफई-टप्पा दोनच्या नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पर्यंत स्थगित करण्याच्या  विनंतीसंदर्भात देखील चर्चा झाली.  त्यावर याबाबत विचार करण्यासाठी गडकरी यांनी सहमती दर्शवली.  त्याचसोबत भारतीय वाहन उद्योग जागतिक दर्जाचा असणे आवश्यक आहे आणि ज्या देशांना वाहने निर्यात केली जातात अशा देशांमध्ये प्रदूषणविरोधी कठोर निकषांची पूर्तता केली जाते तर तेच  निकष  उद्योगक्षेत्राने भारतातही पाळणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

बीएस 6 सीएएफई निकष (कॉर्पोरेट सरासरी  ईंधन क्षमता) टप्पा दोनची अंमलबजावणी पुढे ढकलण्याच्या  मागणीवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या मानकांसह पुढे जाण्याचे आर्थिक दुष्परिणाम आणि बीएस 6 टप्पा एकच्या मानकांच्या पूर्ततेबाबत उद्योगाने कोणती पावले उचलली आहेत त्याचा सविस्तर अहवाल पुढील महिन्यात देण्याचे निर्देश गडकरी यांनी संस्थेच्या प्रतिनिधिमंडळाला दिले.

 

S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1702054) Visitor Counter : 144


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali