शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासक्रमांचे साहित्य प्रकाशित केले

Posted On: 02 MAR 2021 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज नोएडा येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) च्या भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासक्रमांचे साहित्य प्रकाशित केले. या कार्यक्रमास शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, एनआयओएस, विभाग प्रमुख आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

भारतीय ज्ञान परंपरा देश विदेशात पोहचविण्यासाठी एनआयओएस आधीपासूनच प्रयत्न करीत आहे असे पोखरियाल यांनी यावेळी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरण -2020 मध्ये विद्यार्थ्यांमध्ये भारतीयत्वाची अभिमानास्पद भावना निर्माण करण्याबरोबरच आपले प्राचीन ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये स्थापित करण्यावरही भर दिला असल्याचे मंत्र्यांनी अधोरेखित केले. एनआयओएसने तयार केलेली ही अभ्यास सामग्री नवीन शैक्षणिक धोरणाची मूलभूत भावना प्रतिबिंबित करत असून भारतीय संस्कृती, वारसा, तत्वज्ञान आणि प्राचीन ज्ञान नवीन पिढीला आधुनिक संदर्भांसह देण्यासाठी एनआयओएसने आधीपासून केलेले प्रयत्न हे मैलाचा दगड सिद्ध होतील असे पोखरियाल यावेळी म्हणाले.

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702035) Visitor Counter : 175