रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नाग नदीतील प्रदूषण कमी करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी ; नागपूर शहरातील नाग नदीची जैवविविधता आणि पुनरुज्जीवन शक्य होईल

Posted On: 02 MAR 2021 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

 

नाग नदीतील  प्रदूषण कमी करण्याच्या प्रकल्पासाठी 2,117.54 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.  नागपूर शहरातून वाहणारी ही नदी  सांडपाणी आणि  औद्योगिक कचर्‍यामुले अत्यंत प्रदूषित बनली आहे. केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी आज आपल्या कार्यालयात जागतिक बँकेचे अधिकारी, एनएमसीजीचे महासंचालक आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मंजूर  हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय, एनआरसीडी राबवणार आहे. नाग नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये वाहणारे प्रक्रिया न झालेले सांडपाणी, घनकचरा  आणि अन्य अशुद्ध  घटकांच्या बाबतीत प्रदूषणाची पातळी यामुळे कमी होईल.

 

 

 Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1702001) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi