वस्त्रोद्योग मंत्रालय
खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी क्षमता निर्मिती, संरचना, नाविन्यपूर्ण संशोधन, यंत्रसामुग्री उन्नतीकरण, विपणन आदी समस्यांचे योजना/धोरणांच्या माध्यमातून निराकरण केले जाईल - वस्त्रोद्योग सचिव
खेळणी उद्योगाला चालना देताना पक्षपाती स्पर्धेच्या विरोधात एक तुलनात्मक वातावरण तसेच समान संधी निर्माण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल: वाणिज्य सचिव
Posted On:
01 MAR 2021 9:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये आपल्या मन की बात मधील भाषणात मांडलेल्या "इंडिया टॉय फेअर, 2021" कल्पनेमुळे खेळणी उद्योगाला मोठी चालना मिळेल असे वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव यु. पी.सिंग यांनी सांगितले. इंडिया टॉय फेयर -2021 दरम्यान ‘पारंपारिक खेळणी समूहांबरोबर काम करणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा ’ या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 24 प्रमुख क्षेत्रांपैकी एक म्हणून खेळणी निवडण्यात आले होते. ते म्हणाले, उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) खेळण्यांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये वस्त्रोद्योग, एमएसएमई, माहिती आणि प्रसारण, शिक्षण, वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत इतर केंद्रीय मंत्रालये व इतर विभागांना खेळणी उद्योगाला प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताच्या नाविन्यपूर्ण संशोधनाला आव्हान देण्यासाठी आणि खेळणी उद्योगाला भेडसावणार्या वेगवेगळ्या अडचणींवर उपाय शोधणे ही या टॉयकेथॉनच्या मागील कल्पना असल्याचे ते म्हणाले.
सिंह म्हणाले की, इंडिया टॉय फेयर 2021 ने उद्योगाच्या सर्व हितधारकांना शाश्वत संबंध जोडण्यासाठी आणि उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी संवाद वाढवण्यासाठी तसेच भारतीय खेळणी निर्मिती क्षमता जगासमोर आणण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात खेळण्यांच्या निर्यातीत भारताचा भरीव वाटा असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पारंपारिक खेळणी समूहांबरोबर काम करणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथावरील वेबिनारमध्ये भारताच्या पारंपारिक खेळण्यांची हस्तकला, पारंपारिक भारतीय खेळण्यांना आधुनिक रूप देणे, निर्मितीतील आव्हाने, पारंपरिक खेळण्यांचे विपणन आणि पॅकेजिंग यावर भर देण्यात आला होता.
वाणिज्य मंत्रालयाचे सचिव डॉ. अनुप वाधवान म्हणाले की, 'टीआयटीएफ हे भारतीय खेळणी उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी धोरण निर्माते, खेळणी उत्पादक, वितरक, गुंतवणूकदार, उद्योग तज्ज्ञ, एमएसएमई, कारागीर, स्टार्ट अप्स, मुले, पालक आणि शिक्षक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम करत आहे. नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील पद्धतीने खेळणी समूहांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी राज्यांनी खेळणी निर्मिती समूह विकसित केले पाहिजेत. खेळण्यांवर आधारित पर्यटन, स्थानिक खेळणी बँक आणि ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी भर दिला.
खेळण्यांच्या निर्यातीवर परिणाम घडवून आणणाऱ्या व्यवसाय सुलभतेच्या समस्या शोधून काढणे आणि सरकारमधील संबंधित विभागांच्या मदतीने उपाय शोधण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच लवकरात लवकर देशांतर्गत व जागतिक पातळीवर भारतीय खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य विभागाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. खेळण्यांची निर्यात वाढवण्यासंबंधित वेबिनारमध्ये उद्योजकांनी भारताला खेळण्यांसाठी पसंतीचे निर्यात स्थान कसे बनवता येईल याविषयी मते व्यक्त केली आणि भारतातून खेळण्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणांच्या बाबतीत सरकारच्या दृष्टिकोनाबाबत चर्चा केली.
इंडिया टॉय फेअर 2021 च्या तिसर्या दिवशी उद्योग, शिक्षण क्षेत्र व सरकारमधील 35 हून अधिक प्रख्यात वक्ते सहभागी झाले होते. यावेळी चर्चासत्र, वेबिनार आणि चार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खेळणी उत्पादनात नवसंशोधन आणि रचना या विषयावरील पॅनेल चर्चेत नाविन्यपूर्ण संशोधन आणि रचनेच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. भारतीय खेळण्यांचे उत्पादन आणि यातील संधींवरील वेबिनारमध्ये गुजरात, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांची उत्पादन क्षमता अधोरेखित करण्यात आली. खेळण्यांचा दर्जा आणि सुरक्षिततेचे महत्त्व यावरील वेबिनारमध्ये खेळण्यांसाठी सुरक्षितता आणि दर्जा किती महत्त्वपूर्ण आहे यावर जागतिक उद्योगाच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले गेले . खेळण्यांची गुणवत्ता व सुरक्षितता याविषयी सरकारी धोरणे तयार करण्याच्या उत्तम पद्धतींबद्दलही चर्चा झाली.
खेळणी आणि पालक यांच्यावरील वेबिनारः युनिसेफच्या पुढाकारातून घरी शिकण्यासाठी मुलांबरोबर नाविन्यपूर्ण सहभागातून घरांमध्ये पालकांचा सहभाग आणि खेळणी वापरण्याच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. डिझाईन टाउन हॉल ऑन टॉईज वरील वेबिनारमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय श्रेणीतील शिक्षणाचे एक साधन म्हणून सामान्य विद्यार्थ्यांसह विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत खेळण्यांचे विश्लेषण करण्यात आले.
तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये वाराणसीच्या वूडन टॉय क्लस्टर, कोप्पलचे किन्हल टॉय क्लस्टर आणि आशारीकंदी क्लस्टर यांच्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता. तसेच सेंटी टॉईज या खेळण्यांचे उत्पादन करणार्या कंपनीची आभासी सैर देखील करण्यात आली.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701799)