गृह मंत्रालय

भारतीय भूमी पत्तन प्राधिकरणाचा नववा वर्धापन दिन

Posted On: 01 MAR 2021 8:56PM by PIB Mumbai

 

भारतीय भूमी पत्तन प्राधिकरणाने (एलपीएआय) आज नवी दिल्ली येथील मुख्यालयात आपला नववा वर्धापनदिन साजरा केला. केंद्रीय गृहमंत्रालयातील सीमा व्यवस्थापन सचिव संजीव कुमार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 2012 मध्ये स्थापना झाल्यापासून आतापर्यंत प्राधिकरणाने केलेल्या वाटचालीची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष आदित्य मिश्रा यांनी स्वागतपर भाषणात दिली.

प्राधिकरणाने सध्या हाती घेतलेले विविध नवे उपक्रम आणि प्रकल्पांच्या वैशिष्ट्यांबाबतही त्यांनी माहिती दिली.

भारताच्या भू सीमांवर सुविधा उपलब्ध करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये या प्राधिकरणाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची सीमा व्यवस्थापन सचिव संजीव कुमार यांनी प्रशंसा केली. अलीकडच्या कोविड महामारीच्या काळात सीमेवरून प्रवासी आणि मालाची अतिशय सुरक्षित आणि सुरळीत ये-जा करण्यामध्येही प्राधिकरणाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम कुमार आणि भारत सरकारच्या आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले विचार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यक्त केले. यावेळी प्राधिकरणाचे संकेतस्थळ, न्यूजलेटर आणि न्यूज जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701792) Visitor Counter : 164


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri