वस्त्रोद्योग मंत्रालय
पर्यावरणस्नेही आणि मुलांच्या मानसशास्त्राला पूरक खेळणी तयार करावीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
इंडिया टॉय फेयर 2021 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन
स्वदेशी खेळणी उद्योग बळकट करणे, हे चार दिवसांच्या आभासी टॉय फेयरचे उद्दिष्ट
या टॉय फेयरमध्ये सुमारे 1000 हून अधिक प्रदर्शक सहभागी
Posted On:
27 FEB 2021 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून द इंडिया टॉय फेयर - 2021 चे उद्धाटन केले. भारतीय खेळणी उद्योगाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या उद्योगातील भागधारकांना आभासी मंचावर एकत्र आणून शाश्वत दुव्यांची निर्मिती आणि संवादाला चालना देणे हे, इंडिया टॉय फेयर - 2021 या प्रथमच आयोजित केलेल्या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. https://theindiatoyfair.in या आभासी / डिजिटल मंचावर 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत टॉय फेयर भरविण्यात आला आहे. सुमारे 1000 हून अधिक प्रदर्शन या टॉय फेयर मध्ये सहभागी झाले आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.पियुष गोयल, वस्त्रोद्योग आणि महिला बालविकास मंत्री श्रीम.स्मृती झुबीन इराणी,केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आवाहन केले की, भारतीय खेळणी उद्योगांनी लपलेली क्षमता समोर आणून आत्मनिर्भर भारत अभियानाचा मोठा भाग म्हणून ओळख निर्माण करावी. हा पहिला टॉय फेयर फक्त व्यावसायिक आणि आर्थिक कार्यक्रम नसून देशातील क्रीडा आणि खेळांच्या अनेक वर्षे जुन्या संस्कृतीला बळकट करणारा हा दुवा आहे, असे ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, सिंधू संस्कृती, मोहेंजोदडो ते हडप्पा पासूनच्या कालखंडातील खेळण्यांवर जगाने संशोधन केले आहे.जेव्हा परदेशी पर्यटक भारतात येत असत तेव्हा ते भारतीय खेळ शिकत असत आणि ते आपल्यासोबत घेऊन जात असत. ते म्हणाले, टॉय फेयर हा एक असा मंच आहे, जिथे खेळण्यांचे डिझाइन, नाविन्यता, तंत्रज्ञान, विपणन आणि पॅकेजिंग यासंदर्भात चर्चा करता येते आणि अनुभवही सांगता येतात.
पंतप्रधान म्हणाले की, खेळणी मुलांच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावतात.पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया भारतीय जीवनशैलीचा भाग आहे.बहुतांश भारतीय खेळणी नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक वस्तूंपासून तयार केलेली आहेत.त्यात वापरलेले रंगही नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत.त्यांनी सांगितले की, ही खेळणी आपला इतिहास आणि संस्कृतीशी मनाला जोडतात तसेच सामाजिक मानसिक विकास आणि भारतीय दृष्टीकोणाच्या निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरतात .पर्यावरण आणि मुलांचे मानसशास्त्र या दोन्हींना पूरक खेळणी तयार करावीत असे आवाहन त्यांनी खेळणी उत्पादकांना केले.त्यांनी सांगितले की,प्लास्टिकचा कमी वापर करून पुनर्वापर होणाऱ्या वस्तूंचा उपयोग करावा.
पंतप्रधान म्हणाले की, सर्जनशील खेळणी मुलांमधील संवेदना विकसित करतात आणि त्यांच्या कल्पनांना पंख देतात. मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत खेळणी महत्वाची भूमिका बजावत त्यामुळे पालकांनी मुलांसोबत खेळावे असे आवाहन त्यांनी पालकांना केले.
त्यांनी सांगितले की, पालकांनी खेळण्यांचे विज्ञान आणि मुलांच्या विकासात खेळणी बजावत असलेली भूमिका समजून घेतली पाहिजे. भारतीय खेळणी केवळ मनोरंजनच करत नाहीत तर वैज्ञानिक सिद्धांतही शिकवतात. 'भोवरा' आपल्याला गुरुत्वाकर्षण आणि संतुलन शिकवतो, 'बेचकी' आपल्याला गतिशील ऊर्जा शिकवते. ते म्हणाले, नवीन शिक्षण धोरण (एनइपी) च्या माध्यमातून सरकारने या दिशेने प्रभावी पावले उचलली आहेत आणि बदल घडवून आणले आहेत.राष्ट्रीय शिक्षण धोरणात खेळ आधारित आणि कार्यक्षमतेवर आधारित शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ही एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात मुलांच्या तर्कशुद्ध आणि सर्जनशील विचारांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे, असेही ते म्हणाले.
देशात आता 24 महत्वाच्या क्षेत्रात खेळणी उद्योगांना वर्गीकृत करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय खेळणी कृती आराखडाही तयार आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, या उद्योगांना स्पर्धात्मक बनविण्यासाठी आणि आपला देश खेळण्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी 15 मंत्रालये आणि विभागांचा यात समावेश करण्यात आला आहे. ते म्हणाले, आम्ही खेळण्यांचे क्लस्टर्स विकसित करण्यासाठी कार्यरत आहोत जेणेकरून आपली स्थानिक खेळणी जागतिक पातळीवर जातील आणि आत्मनिर्भर भारताच्या बांधणीसाठी मदत होईल. या मोहिमेदरम्यान, खेळण्यांचे क्लस्टर्स तयार करण्यासाठी राज्य सरकारांना समान भागीदार करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खेळणी पर्यटनाची शक्यता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही ते म्हणाले. केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला आणि बालविकास मंत्री श्रीम. स्मृती झुबीन इराणी आपल्या स्वागतपर भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑगस्ट 2020 मधील मन की बात मधील संबोधनाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की,ज्याने आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारतीय नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने भारतीय खेळणी उत्पादन उद्योगांना चालना देण्यासाठी प्रेरित केले.
मंत्र्यानी नमूद केले की,पंतप्रधानांच्या दृष्टीकोणातून, शिक्षण मंत्रालयाने प्रथमच टॉयकेथॉन आयोजित केले होते, यात सहभागी देशभरातील सुमारे 1,29,000 विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्सनी भारतीय खेळणी उद्योगाला पाठिंबा दर्शविला.पंतप्रधानांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून स्थानिक खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच टॉय फेयर आयोजित करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या. श्रीमती. इराणी यांनी पुढे माहिती दिली की, टॉय फेयरमध्ये 11 भागीदार देशांचे मोठे तंबू असतील आणि भारतीय खेळणी उद्योगांशी भागीदार असल्याबाबत अभिमान असणारे तज्ञ आणि उद्योग तज्ञ आणि जागतिक उद्योगपती यांच्यासह 100 वक्ते असतील या आभासी माध्यमातून आयोजित टॉय फेयरसाठी आतापर्यंत 21 लाख लोकांनी नोंदणी केली आहे, भारतीय खेळणी उद्योगाद्वारे जागतिक मैदान उपलब्ध आहे, असे मंत्र्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी कर्नाटकमधील चन्नापटना, उत्तर प्रदेशमधील वाराणसी आणि राजस्थानमधील जयपूरमधील खेळणी निर्मात्यांशी संवाद साधला. कारागिरांनी पंतप्रधानांना त्यांचा खेळणी निर्मितीचा प्रवास आणि मुलांच्या कल्पनाशक्तीनुसार स्वदेशी खेळणी निर्मितीचे अनुभव सांगितले.
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701419)
Visitor Counter : 163